ताज्या घडामोडी

महेंद्र पगार यांची आदर्श कृषी विस्तारक पुरस्कारासाठी निवड

गर्जा महाराष्ट्र24 न्युज वृत्तसेवा

नांदगाव ता.२९ कृषी व कृषी संलग्न क्षेत्रात उत्कृष्ट कामाकरिता दिला जाणारा २०२३- २०२४ चा आदर्श कृषी विस्तारक पुरस्कारासाठी आमोदे (ता.नांदगाव) येथील शेतकरी व नांदगाव तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगार यांची निवड करण्यात आली आहे.

१० ते १४ फेब्रुवारीदरम्यान नाशिक येथे आयोजित करण्यात येणाऱ्या कृषी महोत्सवात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा नाशिक यांच्यामार्फत जिल्ह्यात वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांचा गौरव करण्यात येतो.राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती वृत्तपत्राच्या माध्यमातून मांडत या योजनेचा प्रचार व प्रसार केल्याने त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.या निवडीबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.