ताज्या घडामोडी

महा.अनिस च्या नांदगांव शाखा अध्यक्षपदी प्रा सुरेश नारायणे यांची निवड

गर्जा महाराष्ट्र24 न्युज वृत्तसेवा

मारुतीराव जगधने

नांदगांव ता.३० नांदगांव महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मृलन समितची ची बैठक घेऊन त्यात कार्यकारणी जाहीर करण्यात असून अध्यक्ष पदी प्रा सुरेश नारायणे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. बैठकीत वर्षभरात विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
रविवार दि २८ जानेवारी रोजी दुपारी येथील रिपाई (ए) जन संपर्क कार्यालय येथे महा.अनिस नांदगाव शाखा बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत नविन संकल्पनावर चर्चा करुन शहरात अंधश्रध्दा निर्मूलन या विषयावर अधिक भर घालुन विविध ठिकाणी जन जागृती करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले तसेच तरुण पिढीने स्व:ताहुन पुढे येऊन सहभागी झाल्याने संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक मारुती जगधने,प्रा सुरेश नारायणे यांनी सर्वांचे स्वागत केले.

महा अनिस च्या नांदगाव शाखेच्या २३ पदांपैकी इतर १३ महत्वाच्या पदावर.वामन पोतदार,संदीप जेजुरकर,भास्कर बागुल,मनोज चोपडे, संजय कांदळकर,किरण भालेकर,राजेंद्र गुढेकर,गणेश शर्मा,गोरख जाधव,प्रदीप थोरात,बाबासाहेब कदम,कृष्णा थोरे,मोहसीन बेग,यांची निवड करण्यात आली तर सदस्य म्हणून राजेंद्र जाधव,अभिषेक इघे,गणेश जाधव,संजय जाधव,मनोज जाधव,राजेंद्र वाघ,यांच्या नावाची सन २४-२०२५ च्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. मार्गदर्शक
प्रा सुरेश नारायणे,डॉ सुनिल तुसे,देवीदास मोरे,मारुती जगधने,भाऊसाहेब साठे,वामन पोतदार यांची निवड झाली.दरम्यान बैठकीत १७ फेब्रुवारी २०२४ला जळगाव “बु” येथे चमत्कार दिन साजरा करण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले.

नांदगांव महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मृलन समितीची निवड झालेली कार्यकारणी या प्रमाणे
अध्यक्ष: प्रा सुरेश नारायणे यांची सलग तिसऱ्यांदा तर उपाध्यक्ष: देवीदास मोरे (शहर) यांची दुसऱ्यांदा व उपाध्यक्ष: भगीरथ जेजूरकर (ग्रामीण)यांची दुसर्यांदा निवड झाली.कार्याअध्यक्ष: प्रभाकर निकुंभ सर्पमित्र, प्रधानसचिव: प्रज्ञानंद जाधव पत्रकार,महिला सहभाग विभाग :अँड विद्याताई कसबे,बुवाबाजी संघर्ष कार्यवाह विभाग: मंगेश आहेर ,
मानसिक आरोग्य :डॉ हर्षद तुसे,कायदेविषयक अँड सचिन साळवे,राजेंद्र जाधव सदस्य असे एकुण २३ पदांची नियुक्ती या बैठकीत सर्वांच्या मते निवडण्यात आली.कार्याकारणीतया बैठकीत सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील विवेक विचारांचे जेष्ठ,तरुण या सर्वांनी चिकाटीने सोबत मिळुन काम करु असा निर्धार केला यावेळी बैठकीला पत्रकार,डॉक्टर,वकील, सर्पमित्र,शिक्षक,तसेच समाजिक क्षेत्रातील,विवेक विचारांचे मान्यवर उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.