ताज्या घडामोडी

आमोदे येथे झाप जळून खाक

गर्जा महाराष्ट्र24 न्युज वृत्तसेवा

नांदगाव ता.३० तालुक्यातील आमोदे येथील ज्ञानेश्वरी युवराज सोनवणे हे राहत असलेल्या झोपडीला सोमवारी ता.२९ आग लागून संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाले आहेत सुदैवाने जीवित हानी टळली. याबाबत अधिक माहिती अशी की ज्ञानेश्वर युवराज सोनवणे घरात असलेल्या झोपडीत चुलीत असलेल्या विस्तवाने ही आग लागल्याचे समजते या लागलेल्या आगीने सोनवणे यांच्या संसार उपयोगी वस्तू पूर्णता जळून खाक झाल्या. या घटनेची माहिती तलाठी तुषार येवले यांना कळाल्यानंतर यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत पंचनामा करत वरिष्ठ स्तरावर पाठवला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.