ताज्या घडामोडी

नांदगाव पोलिसांची मोठी कारवाई

तीन चोरट्यांच्याकडून १६ मोटरसायकली हस्तगत.

गर्जा महाराष्ट्र24 न्युज वृत्तसेवा

नांदगाव ता.३१ नांदगाव पोलिसांनी मोटर सायकली विरोधात मोठी कारवाई करत तीन मोटरसायकल चोरट्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडे असलेल्या सोळा मोटरसायकली हस्तगत केल्याची माहिती,नाशिक ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी बुधवार (ता. ३१)रोजी पत्रकार परिषदेत दिली.

या बाबत अधिक माहिती अशी की नांदगाव येथून मोटरसायकली चोरीचे प्रमाण सातत्याने वाढत होते.सागर कायस्थ या गृहस्थाची देखील मोटरसायकल चोरी गेल्याने त्यांनी आपली मोटरसायकल चोरी गेल्याची फिर्याद नांदगाव पोलीस स्थानकात दाखल केली होती, नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली, मोटर सायकल चोरट्यांचा शोध घेण्यासाठी नांदगाव पोलिसांचे एक पथक तयार केले होते. या पोलिसांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचत संशयित इसम अंकुश दादासाहेब गायकवाड राहणार (नांदूर तालुका नांदगाव ) यास ताब्यात घेतले. त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपींनी मोटरसायकल चोरीची कबुली देत आपल्या बरोबर अजून दोन साथीदार असल्याचे सांगितले.यामधील पवन शंकर अहिरे रा,( निंबायती ता. मालेगाव) तसेच,हर्षल मनोहर गवारे वय वर्ष १९ ( नाशिक ) या दोघा आरोपींना देखील पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली.

नांदगाव पोलीस ठाणे हद्दीत चार, येवला शहर पोलीस हद्दीत दोन, येवला तालुका,मनमाड,लासलगाव, मालेगाव छावणी पोलीस हद्दीत प्रत्येकी एक तर नाशिक शहरातून सहा मोटरसायकली चोरी केल्याचे कबूली दिली.या मध्ये पोलिसांनी चोरट्यांकडून सोळा मोटरसायकली हस्तगत केल्या.या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी नाशिक पोलीस ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप,अप्पर पोलीस अधीक्षक,अनिकेत भारती, मनमाड पोलीस उपविभाग अधिकारी सोहेल शेख,नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे,पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे,संतोष बहाकर,पोलिस.हवालदार विनायक जगताप,धर्मराज अलगट,भरत कांदळकर, राजू मोरे,शेख,गोपनीय शाखेचे,आंमलंदार अनिल शेरेकर, दत्तू सोनवणे, कॉन्स्टेबल नंदू चव्हाण,दीपक मुंढे,सागर बोरसे, पो हा. परदेशी,साईनाथ आहेर यांनी गुन्ह्याचा छडा लावला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.