ताज्या घडामोडी

नाशिक ग्रामीण पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांची बदली

नाशिक ग्रामीणचे नवे पोलिस अधिक्षकपदी विक्रम देशमाने,

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा

नाशिक ता .३१ आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने भारतीय पोलिस सेवेतील व राज्य पोलिस सेवेतील ४४ अधिकाऱ्यांच्या बुधवारी (दि.३१) बदल्या केल्या.यात नाशिक ग्रामीणचे पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांची मुंबईत अपर पोलिस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी ठाण्याचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी असलेल्या बीजी शेखर-पाटील यांचा कार्यकाळ पूर्ण व्हायला थोडाच अवधी बाकी असताना त्यांची देखील बदली झाली असून त्यांच्या जागी ठाणे शहरातील सहआयुक्त दत्तात्रय कराळे यांची विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

नाशिकचे अधीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे मुंबईतील विशेष शाखेच्या अपर आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.तर त्यांचा पदभार विक्रम देशमाने यांच्याकडे देण्यात आला.देशमाने यांनी याआधी २०१२ ते २०१३ या कालावधीत नाशिक ग्रामीणमध्ये अपर पोलिस अधिक्षक पदाची जबाबदारी सांभाळली होती.त्यामुळे त्यांना नाशिक ग्रामीणची माहिती आहे.

शहाजी उमप यांची धडाकेबाज कामगिरी….

नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुसाट होता. यामुळे नाशिककर जनता त्रस्त झालेली असताना धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहाजी उमाप यांची नाशिक ग्रामीण च्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती झाली आणि अवैध धंदे करणाऱ्यांचं धाबे चांगलंच दणाणलं होतं. आपल्या कार्यकाळात शहाजी उमाप यांनी अवैध धंदे करणाऱ्यांना सळो की करून सोडले होते..

विशेष पोलिस महानिरीक्षकपदी कराळे….

नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी ठाणे शहरातील सहआयुक्त दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती केली आहे.श्री.कराळे यांनी याआधी २०१६ ते २०१७ मध्ये नाशिक शहरात गुन्हे शाखेचे उपआयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळली होती. तसेच डॉ.बी.जी.शेखर पाटील यांची नियुक्ती अद्याप पदस्थापना दिलेली नसून त्यांच्या नियुक्तीचे स्वतंत्र आदेश काढण्यात येतील असे गृहविभागाने म्हटले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.