आपला जिल्हाताज्या घडामोडी

मांडवडच्या संदीप मोहितेंना लेह लडाख मध्ये वीरमरण

संदीप मोहितेच्या निधनाने नांदगाव तालुक्यात पसरली शोककळा

गर्जा महाराष्ट्र24 न्युज वृत्तसेवा

भालूर (राजेंद्रतळेकर) ता.०२ नांदगाव तालुक्यातील मांडवड येथील भारतीय सैन्य दलात हवालदार संदीप भाऊसाहेब मोहिते (वय 32) वर्षे हे लेह लडाख सैन्य दलात कार्यरत असताना मशीन अँपरेटिंग करत होते.त्यावेळी अपघात झाल्यानै त्यांना लेह लडाख च्या सैन्यदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर वैद्यकीय आधिकारी यांनी वीरगती प्राप्त झाल्याचे सांगितले.ही वार्ता समजताच मांडवड गावात शोककळा पसरली आहे.

जवान संदीप मोहिते यांच्या पुतण्याचे नुकतेच निधन झाल्यानै ते एक महिन्याच्या सुट्टीवर आले होतै.त्याचबरोबर त्यांचे भाऊ श्रीकांत मोहिते हे देखील सैन्यदलात राज्यस्थान च्या जोतपुर येथे कार्यरत आहे दोघा भावांनी एक महिन्याची सुट्टी घेतली होती त्यानंतर संदीप हे 28 जानेवारी रोजी मांडवड वरुन लेह लडाख ला रवाना झाले त्यानंतर आज 1 फेब्रुवारी रोजी सकाळी आपल्या 105 इंजिनिअर रेजिमेंट मध्ये कर्तव्यावर रुजू झाले सकाळी 11 च्या सुमारास मशीन आँपरेटिंग करत असतात त्यांचा अपघात झाला यातच त्यांना वीरगती प्राप्त झाली.संदीप मोहिते हे 14 वर्षापूर्वी 2009 मध्ये सैन्यदलात भरती झाले त्यांनी पुणे येथील प्रशिक्षण केद्रात प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर चंदीगड,अरुणाचल प्रदेश,पठाणकोट, येथे त्यांनी सेवा बजावली याच दरम्यान साऊथ सुडान येथे विदेशात शांतीसैनिक म्हणून शांतीसेनेत त्यांनी काम केले होते आता ते लेह लडाख येथै कार्यरत होते.अशी माहिती त्याच्या समवेत असलेले सैन्यदलातील पिंपरखेड ता.नांदगाव येथील सहकारी दिपक सोमवंशी यांनी दिली
गेले आठ वर्षांपूर्वी मामाची मुलगी मनिषा यांच्याशी विवाह अगदी थाटामाटात संपन्न झाला होता.घटनेचा दिवशी सकाळीसच दोघा पती – पत्नी मध्ये भ्रमणध्वनी वरुन संभाषण झाले होते एकमेकांची खुशाली विचारली होती, शहीद जवान संदीप त्यांच्या पच्चात देवराज,(वय 5वर्षे) व दक्ष (3 वर्षे) अशी दोन मुले असून वडील भाऊसाहेब मोहीते ,आई प्रमिला मोहीते व भाऊ शिवाजी मोहिते हे आपला शेतीव्यवसाय करत असून श्रीकांत मोहिते हे सैन्यदलात आहे…
गुरुवार ता.०१ रोजी सायंकाळी नांदगावचे तहसीलदार श्री सिध्दार्थ मोरे,पोलीस निरीक्षक श्री प्रितम चौधरी, गटविकास अधिकारी संदीप दळवी,तालुका वैद्यकीय अधिकारी श्री संतोष जगताप, दिनेश पगार, माजी सैनिक नानासाहेब काकळीज यांनी संदीप मोहिते यांच्या निवासस्थानी जात वरील घटनेची माहिती दिली या दुःखद घटनेने मांडवड सह संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे. ही घटना नातेवाईकांना समजताच त्याच्या घराकडे येण्याचा ओघ लागला होता……

चौकट…..

लेह लडाख येथील हवामान खराब असल्याने त्यांचे पार्थिव केव्हा येणार याबाबत रात्री उशिरा पर्यंत माहिती समजु शकली नाही तसेच ते मांडवड बारखडी शिवारात राहत असुन त्यांच्या निवासस्थाना कडे जाण्यासाठी तत्काळ रस्त्याचे काम जेसीबी द्वारे हाती घेण्यात येणार आहे अशी माहिती मनमाड बाजार समितीचे संचालक विठ्ठल आहेर,अशोक निकम ,व सागर आहेर यांनी दिली.त्यांचे शिक्षण मांडवड शाळेत झाले होते

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.