ताज्या घडामोडी

वीर जवान संदीप मोहिते यांना उद्या सकाळी ११ ला मांडवडला शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

गर्जा महाराष्ट्र24 वृत्तसेवा

नांदगाव ता.०३ नांदगाव तालुक्यातील मांडवड गावचे भूमिपुत्र हवालदार संदीप भाऊसाहेब मोहिते 105 इंजिनिअर रेजिमेंट मध्ये देश सेवेचे कर्तव्य बजावत असताना लेह लद्दाख या दुर्गम भागात गुरुवारी १ फेब्रुवारी रोजी वीरगतीस प्राप्त झाले त्यांचे पार्थिव शुक्रवारी 2 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री दहा वाजता पुणे येथे विमानाने आल्यावर विमानतळावर मानवंदना दिल्यानंतर रात्री शववाहीकेने शनिवारी सकाळी सात वाजता
मांडवड गावात येणार आहे सकाळी आठ ते साडेनऊ वाजेपर्यंत मांडवड गावात मिरवणूक काढली जाईल यानंतर अंत्यसंस्कार शनिवारी ( ता.3) सकाळी अकरा वाजता मांडवड गावातील स्मशानभूमीत सकाळी ११ वाजता शांकाबंरी नदी तीरावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे अशी माहिती तहसीलदार डॉ सिद्धार्थ कुमार मोरे यांनी दिली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.