ताज्या घडामोडी

मांडवड येथील वीर जवान संदीप मोहितेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.

वीर जवान संदीप मोहितेंचे भव्य स्मारक उभारणार : आमदार सुहास आण्णा कांदे

गर्जा महाराष्ट्र 24 न्युज वृत्तसेवा

नांदगाव ता.०३ मांडवड (ता. नांदगाव ) येथील भूमिपुत्र व भारतीय सैन्य दलातील जवान हवालदार संदीप भाऊसाहेब मोहिते (३३) यांना गुरुवारी ता.१ फेब्रुवारीला लेह लदाख येथे कर्तव्यवावर असतांना वीरमरण आले.त्यांच्या पार्थिवावर आज शनिवारी (ता.०३) मांडवड येथे शाकांबरीतीरावर शोकाकुल वातावरणात, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

लेह लडाख येथे सैन्यदलात कर्तव्य बजावत असताना ०१ फेब्रुवारी रोजी अपघातात मृत्यू झाला होता.त्यांचे पार्थिव आज विमानाने सकाळी ओझर येथे आले शनिवारी (ता.०३) सकाळी ९ च्या सुमारास वीर जवान संदीप भाऊसाहेब मोहिते यांचे पार्थिव मूळ गावी मांडवड येथे आणण्यात आले वीर जवान संदीप मोहिते यांचे पार्थिव घरी पोचताच संदीप मोहितेंच्या नातेवाइकांनी हंबरडा फोडला यावेळी अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाही

फुलांनी व तिरंगा ध्वजाने सजविलेल्या भारतीय सैन्य दलाच्या वाहनातून गावात अंत्ययात्रेला सुरवात झाली गावात प्रत्येक घरासमोर महिलांनी रांगोळ्या काढल्या होत्या.अंत्ययात्रेत एनसीसीच्या विद्यार्थ्यांसह मांडवड सह तालुक्यातील,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अंत्ययात्रा शाकांबरीतिरावर पोहचल्यानंतर वीर जवान संदीप मोहिते अमर रहे,भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम आदी जय घोषणां दिल्या गेल्या.

वीर जवान संदीप मोहिते यांच्या बलिदानाचा गौरव करतानाआमदार सुहास आण्णा.कांदे म्हणाले की,आपले भारतीय जवान आपल्या देश बांधवांसाठी, देशासाठी आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत असतात.त्यांच्यामुळेच आपण आणि आई – बहीण किंवा संपूर्ण कुटुंबं सुरक्षित आहे.पुढच्या पिढीला शहीद संदीप मोहिते यांच्या बलिदानाची ,देशासाठी केलेल्या कर्तव्याची जाणीव रहावी, त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचे उचित असे स्मारक या मांडवड गावात उभारणार असे जाहीर करून तालुक्याचे आमदार सुहासआण्णा कांदे यांनी जाहीर केले शहीद जवान संदीप मोहिते याना नांदगाव तालुक्याच्या वतीने आमदार सुहास कांदे यांनी शहीद जवान संदीप मोहिते यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली

.शहीद जवान संदीप मोहितांना 105 इंजिनिअर रेजिमेंट नायब सुभेदार एस.आर पाडले नायब सुभेदार एस.बी खामकर हवालदार दीपक सोमवंशी हवालदार रवींद्र निकम कमांडिंग ऑफिसर कर्नल करनदिप खत्री, कंपनी कमांडर लेफ्टनल कर्नल जैक्शन जोश, आर्टिलरी सेंटर तर्फे लेफ्टनंट कमांडर ओमकार कपाली कपाले जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नाशिक मेजर चेतन वाले ऑफिसर मेजर चेतन व घुले जी.सी.ओ नायब सुभेदार विनायक माने यांनी पुष्पचक्र वाहिले

माजी आमदार जगन्नाथ धात्रक,अनिलदादा आहेर,संजय पवार,माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, चेतन पाटील राजाभाऊ बनकर, साईनाथ गिडगे सभापती विलासभाऊ आहेर,म.वि.प्र संस्थेचे संचालक अमित बोरसे-पाटील नागापूर ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र पवार आप चे उपजिल्हाप्रमुख विशाल वडघुले,ज्येष्ठ नेते विठ्ठल आबा आहेर,व्यंकटराव आहेर, भाजपा माजी महिला प्रदेशाध्यक्ष अड,जयश्रीताई दौंड भाजपा माजी जिल्हाध्यक्ष बाबा बच्छाव,भाजपा शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष सजनतात्या कवडे,नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक समाधान पाटील, केंद्रीय मंत्री भारतीताई पवार यांचे स्विय सहाय्यक प्रवीण रौंदळ,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष विजय पाटील,माजी आमदार पंकज भुजबळ यांचे सहाय्यक विनोद शेलार भाजपा तालुकाध्यक्ष गणेश शिंदे,शिवसेना माजी तालुकाध्यक्ष संतोषअण्णा गुप्ता,शिवसेना युवा अध्यक्ष सागर हिरे तसेच

येवलेचे प्रांतअधिकारी बाबासाहेब गाढवे तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थकुमार मोरे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी नांदगावचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी,सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे,उपनिरीक्षक मनोज वाघमारे,नायब,तहसीलदार प्रमोद मोरे,मंडल अधिकारी सुवर्णा गाडे,तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष जगताप,तलाठी योगिता निकम माजी सैनिक संघटना अध्यक्ष दिनकर आहेर उपाध्यक्ष बाजीराव मोहिते सचिव नानासाहेब काकडे कमांडो शिवाजीराव डोळे लेफ्टनंट कमांडर निवृत्त ओंकार कापले जिल्हा

सेनिक अधिकारी नाशिक मानद कॅप्टन मार्तंड दाभाडे कल्याण संघटक जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नाशिक संजय खैरनार सैनिकी कल्याण सेवाभावी संस्था कार्यक्षम िक नवनाथ पवार माजी सैनिक सुभेदार तात्या भाऊ मोकळ बीजी ग्रुप पुणे स्मिता मोक्कळ पुणे नांदगाव तालुका मुस्लिम संघटना प्रतिनिधी जाहीरभाई शेख यांनी आदींनी पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

वीर जवान संदीप मोहिते यांच्या पार्थिवास त्यांचा मुलगा देवराज (६) याने अग्नीडाग दिला. पत्नी, मनीषा मोहिते मुलगा दक्ष मोहिते ,वय( ०३) आई, प्रमिला मोहिते वडील,भाऊसाहेब मोहिते भाऊ शिवाजी मोहिते,जवान श्रीकांत मोहिते,पुतणे व कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते.



पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी,तसेच वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी नाशिक सह इतर जिल्ह्यातील हजारोंचा जनसागर लोटला होता.जवान संदीप मोहितांना साश्रू नयनांनी.अखेरचा निरोप देण्यात आला.पोलिसांच्या पथकाने बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देत,शासकीय इतमामात वीर जवान संदीप मोहिते यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी वीर जवान संदीप मोहिते यांना अखेरचा निरोप देण्यासाठी नातेवाईकांसह,माजी सैनिक व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.