ताज्या घडामोडी

मनमाड येथील कोसळलेल्या रेल्वे पुलाचे आमदार सुहास आण्णा कांदेंच्या हस्ते लोकार्पण संपन्न

गेल्या 60 ते 65 दिवस बंद असलेल्या इंदोर- पुणेसाठी जाणाऱ्या अवजड वाहतुकीस आज पासून सुरवात....

गर्जा महाराष्ट्र 24 न्युजवृत्तसेवा

मनमाड ता.०५ नाशिकच्या मनमाड शहरातून जाणारा इंदोर – पुणे महामार्ग वरील पुलाची संरक्षण भिंत कोसळल्याने गेल्या 64 दिवसांपासून या मार्गावरील अवजड वाहतूक बंद होती यामुळे शहरातील उत्तर आणि दक्षिण भागातील नागरिकांना दळणवळण साठी मोठी कसरत करावी लागत होती.

मात्र नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या पाठपुराव्याने कोसळलेल्या रेल्वे पुलासाठी तातडीने 3 कोटी रुपये मंजूर करून घेऊन या पुलाचे काम जलदगतीने पूर्ण केले गेले रविवारी या इंदोर-पुणे महामार्गाचा लोकार्पण सोहळा आमदार सुहासआण्णा कांदे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी आमदार सुहास आण्णा कांदे म्हणाले की मी ही जी कामे मनमाड शहरात करत आहे,ते तुमच्या उपकारामुळेच कारण तुम्ही मला एका डोंगरा एवढ्या माणसाच्या विरोधात मते देऊन निवडून आणले आहे.या उपकारातून उतराई होण्यासाठी मी अखेरपर्यंत या मनमाड चा विकास करत राहणार असे स्प्ष्ट अभिवचन तालुक्याचे आमदार सुहासआण्णा कांदे यांनी यावेळी दिले. पुढे बोलताना आमदार श्री.कांदे म्हणाले की,काही दिवसापूर्वी तुटलेल्या रेल्वे पुलामुळे या राष्ट्रीय महामार्गावरील पूर्ण वाहतूक विस्कळीत झाली होती.त्याचा प्रचंड त्रास मनमाड सह नांदगावला ही होत होता.म्हणून तात्काळ मुख्यमंत्री नाएकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर ही गोष्ट घातली.त्यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्री चव्हाण साहेबांकडून या पुलाच्या दुरुस्तीसाठी तीन कोटी रुपये मंजूर करून दिले.आणि सर्वांच्या सहकार्याने जलद गतीने हा पूल पूर्ण झाला. आजपर्यंत झालेल्या त्रासाबद्दल त्यांनी शहरवासीयांची माफीही मागीतली.

सोमवार ता.०५ पासून या मार्गावरुन पुन्हा एकदा इंदुर-पुणे, सुरत-पुणे या राज्य मार्गावरील वाहतूक सुरळीत होणार असून मनमाडच्या नागरीकांना एका भागातून दुस-या भागात जाण्यासाठी जी अडचण होती ती आता दूर झाली आहे.या वेळी शहरातील प्रतिष्ठित मान्यवर,शिवसेना,भाजपा,रिपाई,आदी पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.