ताज्या घडामोडी

शिवकन्या संगीता सोनवणे यांना छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार जाहिर..

गर्जा महाराष्ट्र 24न्यूज वृत्तसेवा

नांदगाव ता.१४छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील
जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने देण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२४ नांदगावच्या शिवकन्या व समाजसेविका सौ संगीता सोनवणे यांना जाहीर झाला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत मोटे यांनी प्रसिद्धीस दिली असुन शिवजयंती नंतर हा पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात येणार असल्याचे श्री .मोटे यांनी सांगितले.

सौ संगीता सोनवणे यांचे शिवकार्य सर्वश्रुत असुन त्यांच्या कार्याची दखल राज्यपातळीवर घेण्यात आली आहे जवळपास ४३ पुरस्काराने आजवर त्यांना सन्मानित करण्यात आले असुन यंदाही त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दोन ठिकाणी पुरस्कार जाहीर झाले आहेत त्यातील संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर येथील जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने देण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२४ जाहीर झाला आहे.काही दिवसात मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.