ताज्या घडामोडी

नांदगांव – चाळीसगाव रस्त्यावरील पिंपरखेड येथील टोलवसुली अखेर बंद

शिवसेनेचे आंदोलन : महामार्गाचे काम अपूर्ण, मूलभूत सुविधा नसताना सुरू केली होती वसुली

गर्जा महाराष्ट्र २४ वृत्तसेवा

नांदगाव ता.१४ महामार्गाचे काम अद्यापही अपूर्णावस्थेत असताना नांदगांव – चाळीसगांव रस्त्यावरील पिंपरखेड येथील टोल प्लाझावर सुरू करण्यात आलेली टोलवसुली पहिल्याच दिवशीशिवसेना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडली.

जळगाव ते चांदवड या महामार्गाचे काम अजून पूर्ण झालेले नसतानाही या महामार्गांवरील (एन एच ७५३ जे) टोल वसूल केली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तालुक्याचे आमदार सुहासआण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेचे जिल्हाप्रमुख फरहान खान यांनी आपल्या पदाधिकाऱ्यासह टोल बंद करण्याचे निवेदन देताच टोल प्रशासनाने सदर महामार्गाचे काम पूर्ण झाल्याशिवाय टोल वसूल करणार नसल्याचे जाहीर केले.

टोल व्यवस्थापन समितीच्या व्यवस्थापक यांना दिलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की,राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर जळगाव ते चांदवड संपूर्ण मार्ग सिमेंटचा बनवण्यात आला.मात्र अजूनही महामार्गांवर ज्या सुविधा वाहनचालकांना उपलब्ध केल्या जातात.त्याची मात्र अजूनही पूर्तता करण्यात आलेली नाही.त्यात प्रथमोपचार,शौचालय,बाथरूम,आराम गृह,रुग्णवाहीका,क्रेन हवा भरण्यासाठी यंत्र,यासह अनेक सुविधांचा वानवा दिसून येत असल्याचे दिसून आल्याने सदर टोलनाका त्तकाळ बंद करावा असे निवेदन दिले.
युवा सेनेची ही मागणी टोल प्रशासनाने त्तकाळ मान्य करत टोल वसुली थांबवून टोल पूर्ण सुविधा दिल्यानंतरच सुरु केला जाईल.असे जाहीर केले.यावेळी राजेंद्र देशमुख,ज्ञानेश्वर कांदे,तालुका सेनेचे तालुकाप्रमुख सागर हिरे,शहरप्रमुख सुनील जाधव,अय्याज शेख,महेंद्र गायकवाड,बापू जाधव,भावराव बागुल,भैय्या पगार,सचिन पगार,शशी सोनवणे,नितीन सोनवणे,गणेश हातेकर,गौरव बोरसे,अमान खान, मनमाड शहर प्रमुख योगेश इमले,उपाध्यक्ष मन्नू शेख,माजी नगरसेवक आझाद पठाण,गणेश कुमावत,रोशन बोरसे,प्रीतम पवार,बाळा काकळीज, मनिष बागोरे,वाल्मिक निकम,सचिन उदावंत,संदीप मवाळ,प्रथमेश बोरसे,अविनाश लुटे,जीवन भाबड,आबा बोरसे,चेतन बोरसे,पवन झाडगे,गोपी मोरे,गोकुळ मोरे,विकी बोरसे,सोनू इप्पर,दिपक,गणेश पवार,जीवन भाबड, आदिंसह शेकडो युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.