ताज्या घडामोडी

१२ वी परीक्षेची नांदगाव केंद्राची आसन व्यवस्था जाहीर

गर्जा महाराष्ट्र 24न्यूज वृत्तसेवा

नांदगाव, ता. 18 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता १२ वी परीक्षेची नांदगाव केंद्र क्रमांक २२० ची आसनव्यवस्था जाहीर करण्यात आली आहे.ही आसनव्यवस्था कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीतच करण्यात आली आहे. महाविद्यालयाच्या केंद्रावर कर्मवीर भाऊराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालय साकोरे,आणि जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भालुर या शाळेतील विद्यार्थ्यांचीही आसनव्यवस्था महाविद्यालयाच्या इमारतीतच केली आहे.२१ फेब्रुवारी २०२४ ते १६ मार्च २०२४ या कालावधीतील सर्व पेपर महाविद्यालय इमारतीतच होतील. ही आसनव्यवस्था दर पेपरला बदलणारी असेल संबंधित विद्यार्थ्यांनी ती आसनव्यवस्था वेळोवेळी पहावी.

२१ फेब्रुवारीला असलेल्या इंग्रजी विषयासाठी हॉल क्रमांक ०१ ते १४ मुख्य इमारतीचा वरचा मजल्यावर असेल तर हॉल क्रमांक १५ ते २५ मुख्य इमारतीचा पहिला मजला व हॉल क्रमांक २६ ते २८ तळमजला व आयटीलॅब अशी आसनव्यवस्था असेल.परीक्षेला येताना विद्यार्थ्यांनी ३० मिनिटे अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे.परीक्षार्थीनी परीक्षा तणावमुक्त व निकोप वातावरणात द्यावी.सोबत येताना ओळख पत्र, परीक्षाहॉल तिकीट,सोबत आणावे असे आवाहन प्राचार्य डॉ.एस.एन. शिंदे,केंद्र संचालक प्रा.डी.एम.राठोड यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.