ताज्या घडामोडी

मनमाडला आज छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे लोकार्पण

आज मनमाडकरांचे स्वप्न साकार होणार...

गर्जा महारा्ट्र 24न्यूज वृत्तसेवा

मनमाड ता.१८ शहरात गेल्या ४० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जनतेचे स्वप्न पूर्ण होत असून आमदार सुहासआण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून साकारण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक आणि पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज सायंकाळी सहाला दिमाखात होणार आहे. लोकार्पण दिवस हा मोठ्या उत्सवासारखा साजरा करण्यात येणार असल्याने या कार्यक्रमाची जय्यत तयारी मनमाड शहरात सुरू असून शिवप्रेमीमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याने मनमाड शहर भगवेमय झाले आहे.

मनमाड शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा बसवलेल्या अर्धाकृती पुतळ्याला ६५ वर्ष झाले आहे. मनमाड शहरात गेल्या ४० वर्षापासून पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा ही मागणी शिवप्रेमीकडून होत होती. त्यासाठी अनेकदा विविध राजकीय पक्ष, संघटनेच्या माध्यमातून आंदोलने, मोचें, निवेदने केले गेले. अनेकदा शासन दरबारी प्रयत्न केले गेले मात्र शासनस्तरावर प्रतिसाद मिळाला नाही. मात्र आमदार सुहास आण्णा कांदे यांनी ही मागणी तडीस नेण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांना त्यात यश आले. आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून शहरातील इंडियन हायस्कूल समोर बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा आणि मेघडंबरी स्मारक उभारण्यात आले आहे.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि पुतळ्याच्या परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे.आज सायंकाळी आमदार सुहासआण्णा कांदे,समाजसेविका सौ.अंजुमताई कांद यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. छत्रपतींच्या पुतळ्याचे पुजन करण्यात येईल.यावेळी रायगडावरील पवित्र जलाने जलाभिषेक करण्यात येणार आहे.शिवशाहीर सुरेश जाधव यांचा ‘शाहिरी जलसा’ कार्यक्रम रात्री आठला होणार आहे.

कार्यक्रमाची जय्यत तयारी…

या लोकार्पण कार्यक्रमाला मनमाड शहर सज्ज झाले असून शहरातील विविध भागात डिजिटल फलक,पताका,भगवे ध्वज लावण्यात आले आहे.सर्वत्र विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.आज सर्व शिवप्रेमी मोठ्या उत्साहात यात सहभागी होणार आहे.१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती असल्याने सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष राजेंद्र अहिरे यांच्या नेतृत्वाखाली समितीने जयंतीची जय्यत तयारी केली असून दुपारी शोभायात्रा मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी पुतळ्यावर आणि शिवजयंती मिरवणुकीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. यावेळी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सातला प्रा. प्रकाशकुमार वाघमारे यांच्या ‘रायबा हेच का आपले स्वराज्य’ या महानाट्य आयोजित करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया…..

शिव प्रेमीकडून मागणी असलेली आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळ्याची आज मागणी पूर्ण झाली आहे.त्याचा लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाखात होत असून यानिमित्ताने मनमाड शहर सजले आहे. या सोहळ्यास मनमाडकरांनी उपस्थित राहून ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे. •

सुहासआण्णा कांदे,आमदार,नांदगाव

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.