ताज्या घडामोडी

एकदा ठरलं ते ठरलं आत्ता बदल नाही.. आता.गावागावांत रास्ता रोको

नांदगावला सकल मराठा समाज बैठकीत निर्णय

गर्जा महाराष्ट्र 24न्यूज वृत्तसेवा

नांदगाव ता.23 राज्य सरकारने विशेष अधिवेशनात मराठा समाजाला नोकरीत व शिक्षणात 10 टकके आरक्षण विधेयक एकमताने मंजूर केले पण.मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावे,अशी मागणी मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी करत आंदोलनाची पुढील दिशा जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या २४ फेब्रुवारी ते २ मार्च पर्यंत नांदगांव तालुक्यातील प्रत्येक गावात तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय सकल मराठा समाजातर्फे येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

. या पार्श्वभूमीवर येथील जुने तहसील कार्यालय आवारातील आंदोलन स्थळावर सकल मराठा समाजाची बैठक बुधवारी ता 21ला रात्री आयोजित केली गेली. या बैठकीत राज्य सरकारला सगेसोयरे अधिसूचना कायद्यात रूपांतराची मागणी पूर्ण करण्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी दोन दिवसांची मुदत दिली आहे. मागणी मान्य न झाल्यास २४ फेब्रुवारीपासून ते २ मार्चपर्यंत तालुक्यात प्रत्येक गावात सकाळी १०:३० ते १:३० असे तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.