ताज्या घडामोडी

नांदगाव तालुक्यात प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्सव उत्स्फूर्तपणे साजरा

गर्जा महाराष्ट्र 24न्युजवृत्सेवा

नांदगाव ता.१४ सुतार समाज्याचे आराध्य दैवत प्रभु श्री विश्वकर्मा महाराज जयंती उत्सव सालाबादाप्रमाने नांदगाव येथील हनुमाननगर मधील श्री विश्वकर्मा महाराज मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सकाळी १०ः०० वाजता श्री विश्वकर्मा महाराजांच्या मुर्तीची विधिवित पुजा व सत्यनाराण महापुजा रमेश पेंढारकर व सौ .फुलवंता पेंढारकर यांनी सपत्नीक केली तर महाआरती विश्वकर्मा सुतार समाज विकास संस्थेचे पदाधिकारी यांनी सपत्नीक यांनी केली.

यावेळी कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक ,चंद्रशेखर कवडे,अँँड सचिन साळवे, आप चे जिल्हा उपाध्यक्ष विशाल वडघुले, संतोष गोसावी नंदू पाटील,जेष्ट पत्रकार संजीव निकम, सुरेश शेळके, पत्रकार संजय मोरे,अनिल आव्हाड, प्रमित आहेर, सचिन बैरागी, महेंद्र पगार,अनिल धामणे, राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते.



जयंतीनिमित्त समाज बांधवांना जेष्टे नेते बापुसाहेब कवडे, आमदार सुहासआण्णा कांदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेज कवडे यांनी शुभेच्छा दिल्या..या प्रसंगी कार्यक्रमास उपस्थित प्रमुख अतिथींचा स्वागत विश्वकर्मा सुतार समाज विकास संस्थेच्या वतीने करण्यात आले.या प्रसंगी प्रमुख अतिथी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की श्री विश्वकर्मा भगवान हे सर्व समाज्याचे दैवत आहे तालुक्यात सुतार समाज्याचे संघटन असून याचे फलित नांदगाव शहरात प्रभू विश्वकर्मा भगवान चे भव्य मंदिर उभारले असून या बरोबरच या ठिकाणी इतर विकास कामे जोमात सुरू आहे. आमदार सुहासआण्णा कांदे यांनी मंदीर परिसरात सभामंडपसाठी निधी दिल्याबद्दल समाज्याच्या वतीने आभार मानण्यात आले. यावेळी उपस्थित महिलानी हळदी कुंकवाच कार्यकम झाला.उपस्थिताना विश्वकर्मा युवा मंडाळाचे अशोक पेंढारकर यांच्या तर्फ महाप्रसाद वाटप करण्यात आला.या प्रसंगी विश्वकर्मा सुतार समाज विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संजय कदम संचालक नंदुलाल अहिरे,सुभाष पेंढारकर,मधुकर खैरनार,राजेंद खैरनार, दिगंबर गवळे,दयाराम सूर्यवंशी,सचिव बाबासाहेब कदम खजिनदार दिपक मोरे, निबाजी हिरे, अशोक कदम सोपान कदम,बाळासाहेब जाधव, सुनील शेलार ,संतोष जाधव,विश्वकर्मा युवा मंडळाचे किरण हिरे, रोशन हिरे,जयवंत पेंढारकर, नरेंद्र सूर्यवंशी,सौरभ मोरे,समाधान कदम,स्वप्नील खैरनार,समाधान खैरनार, रोशन हिरे, मयूर कदम, श्री विश्वकर्मा महिला मंडळाच्या संगिता कदम,सुलोचना खैरनार,उषा पेंढारकर,सुंनदा आहिरे, विद्या कदम,पुष्पा मोरे,,निता जाधव,दिपाली आहिरे,सोनाली जाधव,फुलवंता,पेंढारकर, संगिता हिरे, राणी शेलर,ज्योती शेलार, आदी माहिला मोठया संख्येने उपस्थितत होते.

फोटो ओळ,:-

१) नांदगाव :- येथील हनुमानगर श्री विश्वकर्मा मंदीरात विश्वकर्मा जयंती निमित्ताने मूर्ती पूजन करताना संजय कदम, नंदुलाल आहिरे, मधुकर खैरणार, सुभाष पेंढारकर, संतोष जाधव, दिपक मोरे,निबा हिरे समाधान कदम आदि

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.