ताज्या घडामोडी

राज्यात आज ‘रास्ता रोको’ अन् धरणे आंदोलन

मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगेंची घोषणा; अंतरवालीत उद्या पुन्हा बैठक

गर्जा महाराष्ट्र २४ न्युज वृत्तसेवा

नाशिक ता.२४ मराठा आरक्षणासाठी मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या आवाहनानुसार आज शनिवारी (ता. २४) संपूर्ण राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. न्यायालयातील सुनावणीनंतर या आंदोलनाचे स्वरूप बदलण्यात आले असून, शनिवारी सकाळी अकरा ते दुपारी एकपर्यंत गाव ते शहर पातळीवर एकाचवेळी रास्ता रोको,त्यानंतर लगेचच धरणे आंदोलन करण्यात येईल.

रविवारी (ता. २५) अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे पुन्हा समाजबांधवांची बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल, असे श्री जरांगे यांनी सांगितले.विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला नोकरी व शिक्षणात दहा टक्के आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर मराठा समाजाला ओबीसीतून टिकणारे आरक्षण,सम्यासोयऱ्यांच्या अध्यादेशाचा कायदा करून अंमलबजावणी,आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे आदी मागण्यांवर श्री जरांगे ठाम आहेत.त्यामुळे समाजबांधवांची बैठक घेऊन त्यांनी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली होती. त्यानुसार २४ फेब्रुवारीपासून गावागावांत सकाळी किंवा सायंकाळी काहीकाळ रास्ता रोको,तीन मार्चला प्रत्येक जिल्हास्थळी रास्तारोको आदींसह अन्य काही निर्णय जाहीर केले होते.अंतरवाली सराटी येथे आजच्या पत्रकार परिषदेत श्री जरांगे यांनी परीक्षार्थी,समाजबांधव व न्यायालयाचा आदर ठेवत या नियोजनात काही बदल करीत असल्याचे स्पष्ट केले.त्यानुसार शनिवारी गावागावांत, शहरात एकाचवेळी सकाळी अकरा ते दुपारी एकपर्यंत रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.त्यानंतर – लगेचच गावागावांतील ग्रामपंचायत कार्यालय,शहरात तहसील कार्यालयासमोर फक्त धरणे आंदोलन करण्यात येईल. या ठिकाणी कोणी शासकीय अधिकारी निवेदन घेण्यासाठी आले नाही तर त्या त्या ठिकाणी रास्ता रोको करण्यात येईल. अंतरवाली सराटी येथे रविवारी (ता.२५) दुपारी समाजबांधवांची बैठक घेऊन पुढील निर्णय घेतले जातील,असे श्री जरांगे पाटिल यांनी सांगितले.

‘परीक्षार्थीची काळजी घ्या’******

न्याय्य हक्कासाठी लोकशाही मागनि शांततेत रास्ता रोको आंदोलन करावे, परीक्षेचा काळ असून विद्याथ्यांना प्रवासात अडचण आली तर त्यांना मदत करा, परीक्षाथीना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घ्यावी, सामाजिक कार्यक्रम असल्यास सहकार्य करावे, आंदोलन करतेवेळी व्हिडिओ शूटिंग करावे आदी सूचना श्री जरांगे यांनी केल्या आहेत….

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.