ताज्या घडामोडी

नांदगावला ‘रास्ता रोको’

सगेसोयऱ्यांच्या समावेश व्हावा: मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे

गर्जा महाराष्ट्र २४न्यूजवृत्सेवा

नांदगाव ता.२४ मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठींबा देण्यासाठी नांदगांव येथे जुन्या तहसीलजवळील त्रिफुलौवर तीन तासाहून अधिक काळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे छत्रपती संभाजीनगर मालेगाव मनमाड चाळीसगाव या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती.

दीड ते दोन किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.रास्तारोको आंदोलनाला उत्स्फर्तपणे प्रतिसाद मिळाला असून येत्या सप्ताहात दररोज तालुक्याच्या विविध प्रमुख ठिकाणी अशीच आंदोलने करण्यात येणार आहेत.आंदोलकांनी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कडक उन्हात ठाण मांडून बसलेल्या आंदोलकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.रास्ता रोको मधून शाळकरी मुलाची वाहने,पिण्याच्या पाण्याचे टँकर्स,रुग्णवाहिका यांना वगळण्यात आले होते..

विशाल वडघुले,भीमराज लोखंडे,विष्णू चव्हाण,भास्कर झाल्टॆ
निवृत्ती खालकर,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश बोरसे,माजी सभापती विलासराव आहेर,माजी नगराध्यक्ष राजेश कवडे,शिवसेना उबाठाचे तालुकाप्रमुख संतोष गुप्ता,नीलेश चव्हाण,नाना शिंदे,नंदू पाटील,रमेश काकळीज, सतीरा बोरसे,सचिन पवार दीपक मोरे आदी सहभागी झाले होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.