ताज्या घडामोडी

जातेगाव येथे श्री विश्वकर्मा भगवान जयंती उत्साहात साजरी

गर्जा महाराष्ट्र २४न्यूजवृत्सेवा

नांदगाव ता.२५ घाटमाथ्यावरील जातेगावसह परिसरात वास्तूकला, चौसष्टकलेची देवता भगवान विश्वकर्मा यांची जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.गावातील विश्वकर्मा पांचाळ सूतार समाज बांधवांतर्फे विश्वकर्मा जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.ग्रामपालिका कार्यालयात प्रभू विश्वकर्मा प्रतिमेचे पुजन उपस्थित ग्रामपालिका पदाधिकारी व समाज बांधवांतर्फे करण्यात आले.यावेळी विजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास ग्रामपालिका उपसरपंच पंढरीनाथ वर्षे,रामदास पाटील, बाळू लाठे,संतोष गायकवाड,राजू शेख,सोमनाथ जाधव,दिपक पगारे,सागर पगारे,सोपान खिरडकर,अंकूश त्रिभुवन,शांताराम जाधव, शिवहार जाधव,मच्छिंद्र बागूल,धनराज बागूल, सर्जेराव जैतमल,नंदू जैतमल,दादा जाधव,गणेश जाधव,विनोद सोनवणे,रामेश्वर सोनवणे,सागर जाधव,ईश्वर जाधव आदींसह सुतार समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.