ताज्या घडामोडी

आबा सरोवर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा

ईश्वर जाधव
जातेगांव : ता.26 नांदगाव तालूक्यातील जवळकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे कार्यरत मुख्याध्यापक आबा सरोवर यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनलकडून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. जवळकी येथे कार्यरत असलेले मुख्याध्यापक आबा सरोवर यांनी नवोपक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊन गुणवत्तेच्या सार्वत्रिकीकरणासाठी विशेष प्रयत्न केले.या कार्याची दखल घेऊन शिक्षक फाऊंडेशन संचलित महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या वतीने सन २०२४ चा राज्यस्तरीय सेवासन्मान आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी सरोवर यांची निवड करण्यात आली आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा हा नाशिक येथे १४ मे २०२४ रोजी होणार असून सरोवर यांचे या यशाबद्दल विविध क्षेत्रातून कौतुक केले जात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.