ताज्या घडामोडी

अमृत स्टेशन योजनेंतर्गत केंद्राकडून नांदगाव रेल्वे स्टेशनला दहा कोटी

नांदगाव रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूजवृत्सेवा

नांदगांव ता.२८ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे नांदगावसह मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील १५ रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामाच्या पायाभरणीचा शुभारंभ सोमवारी (ता. २६) झाला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण येथील स्थानकावरील एका मोठ्या पडद्यावर करण्यात आले. पायाभरणी शुभारंभापूवीं व्ही.जे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला


अमृत स्टेशन योजनेतंर्गत भुसावळ विभागातील बडनेरा,मलकापूर, मूर्तिजापूर,नेपानगर,शेगाव, देवळाली, मनमाड, नांदुरा, नांदगाव, चाळीसगाव, पाचोरा,धुळे, लासलगाव, रावेर आणि सावदा स्थानके या योजनेअंतर्गत पुनर्विकासासाठी निश्चित करण्यातआली आहेत.
मध्य रेल्वेसाठी २०२३- २४ मध्ये भुसावळ विभागासाठी १८४ कोटी रुपयांसह १ हजार ७२० कोटीरुपयांची तरतूद करण्यात आली असून या योजनेंतर्गत विविध कामांच्या पहिल्या टप्प्यात पुनर्विकासाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. नांदगाव स्थानकाच्या विकासासाठी दहा कोटी रुपये खर्चातून स्थानकाबाहेर प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण, फलाटावर एलईडी प्रकाशयोजना,तिकीटविक्री खिडकी,आधुनिक प्रतिक्षालय आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आहे. यावेळी कार्यक्रमाला भाजप अॅड. जयश्री दौंड,भाजपा व्यापारी आघाडीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दत्तराज छाजेड, जिल्हा सरचिटणीस संजय सानप केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती ताई पवार यांचे स्विय सहायक प्रवीण रोंदळ,नांदगाव तहसीलदार सुनिल सैदाणे पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी प्रवाशी संघटनेचे तुषार पांडे केंद्रिय रेल्वे समिती मुश्ताक शेख बाबाजी शिरसाट निशांत बोडके सागर फाटे तालुका अध्यक्ष गणेश शिंदे शहर अध्यक्ष राजाभाऊ बनकर नरेंद्र पारख सागर फाटे वामन पोतदार मेजर जगन्नाथ साळुंखे सुमित सोनवणे यांच्यासह प्रवासी संघटनेचे पदाधिकारी, भाजपन स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थितीत होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.