ताज्या घडामोडी

मराठी भाषा टिकवण्यासाठी मराठी भाषिकांनी प्रयत्न करण्याची गरज -प्रा.सुरेश नारायणे

गर्जा महाराष्ट्र २४न्युजवृत्तसेवा

नांदगाव ता.२८ भारतातील एकुण बावीस प्रादेशिक भाषांपैकी मराठी भाषा ही समृद्ध आहे. पण आधुनिक काळात इंग्रजी व हिंदी भाषेच्या आक्रमणामुळे मराठी भाषेला उतरती कळा लागली आहे. म्हणून मराठी भाषा टिकवण्यासाठी मराठी भाषिकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे असे येथील जेष्ठ साहित्यिक प्रा.सुरेश नारायणे यांनी प्रतिपादन केले.

ते व्ही.जे.हायस्कूल मध्ये कविश्रेष्ठ,मराठी साहित्यसम्राट व ज्ञानपीठ विजेते वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला गेला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक खंडु खालकर यांनी केले.प्रमुख अतिथींच्या हस्ते वि.वा.शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.विद्यालयाचे शिक्षक भामरे सर यांनी अतिथींचा परिचय करून दिला.या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्यांनी स्वरचित केलेल्या कवितांचे वाचन केले.या कवितेतुन सामाजिक,शैक्षणिक,विज्ञान,तंत्रज्ञान व निसर्गावर आधारित सुरेल असे कवितांचे सादरीकरण केले.तर विद्यालयातील नववीची इकरा खाटीक या विद्यार्थ्यांनीने मराठी दिनाचे महत्त्व मनोगतातून व्यक्त केले.तर समृध्दी शेवाळे या विद्यार्थ्यांनीने कुसुमाग्रज यांच्याविषयी माहिती सांगितली या दिनाचे औचित्य साधून विद्यालयात मराठी हस्ताक्षर स्पर्धा,व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेतील सर्वच स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली.मराठी भाषा जतन कशी केली जाईल या बाबतीत सखोल मार्गदर्शन करतांना ते म्हणाले की इंग्रजी भाषेतील नावांच्या पाट्या मराठीत करण्याचा आग्रह धराला,इंग्रजीत सही न करता मराठीत सही करण्याची सवय लावा,मराठीतील उत्तमोत्तम साहित्याचे वाचन करा,तसेच मराठी चित्रपट,नाटके पहा,मराठी भाषा बोलण्याचे सातत्य ठेवा,आदी द्वारे मराठी अधिक समृध्द व संपन्न होईल असा त्यांनी यावेळी विश्वास व्यक्त केला. त्यांनी यावेळी काव्यझुला या काव्यसंग्रहाच्या प्रती शाळेला भेट दिल्या.

या नंतर विद्यार्थ्यांनी मराठी भाषा संवर्धनासाठी प्रतिज्ञा घेतली.या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन रोशनी थोरे या विद्यार्थ्यांनीने केले.मराठी विभाग प्रमुख रविंद्र ठाकरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक एल.एन.ठाकरे,उपमुख्याध्यापक श्री.के.खालकर,पर्यवेक्षक मिलिंद श्रीवास्तव,मधे श्रीमती आहेर,श्रीमती सांगळे,विजय चव्हाण,दाभाडे , श्रीमती पाटील,आहेर आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.