ताज्या घडामोडी

टाकळी बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी अध्यक्षपदी माणिकराव आहेर तर उपाध्क्षपदी लहू कडाळे यांची बिनविरोध निवड….

गर्जा महाराष्ट्र 24न्यूज वृत्तसेवा

बाणगाव बुद्रूक ता.०१ तालुक्यातील टाकळी बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी अध्यक्षपदी माणिकराव आहेर तर उपाध्क्षपदी लहू कडाळे यांची बिनविरोध निवड.झाली.

टाकळी बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्ष व उपाधयक्ष पदाची निवणूक गुरुवारी ता. २९रोजी संपन्न झाली अध्यक्षपदी माणिकराव कोंडाजी आहेर यांची तर उपाधयक्षपदी लहू गिरजू कडाळे यांची बिनविरोध निवड संपन्न झाली निवडणुक अधिकारी प्रभाकर पाटील सहकार अधिकारी सहाय्यक निबंध कार्यालय नांदगाव यांचे अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलाविण्यात आली होती यावेळी ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांचे हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करत सत्कार करण्यात आलां यावेळी संस्थेचे संचालक विश्वनाथ कवडे,शब्बीर शेख,बाळासाहेब पवार,अर्जुन कोल्हे,बाबुराव पवार,अंबादास पवार,साहेबराव पवार,लहू कडाळे,दीपक पवार संचालक उपस्थित होते. निवडनुक कामी संस्थेचे सचिव बाळासाहेब पवार यांनी सहकार्य केले . यावेळी बाणगाव बूद्रक ग्रामपंचायत सदस्य शांताराम काका कवडे साईनाथ रामकर,विक्रम गोडसे,बाबासाहेब पवार,वाल्मीक घोडके,कचरू मेंगाळ ,अशोक कोल्हे,विलास पवार आदि सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते.या निवडीबद्दल नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे आमदार.सुहास आण्णा कांदे,माजी नगराध्यक्ष राजेश कवडे,कृषी उत्पन्न बाजार समिती .माजी सभापती तेजदादा कवडे यांनी अभिनंदन केले आहे.

फोटो ओळ
नांदगाव / टाकळी बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी अध्यक्षपदी माणिकराव आहेर तर उपाध्क्षपदी लहू कडाळे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल अभिनंदन करताना ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे,सचिव बाळासाहेब पवार व संचालक आदी

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.