ताज्या घडामोडी

नमन शैक्षणिक संस्थेच्या लिट्ल स्टार व रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन,पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा

गर्जा महाराष्ट्र 24 वृत्तसेवा
बाणगाव बुद्रक ता.02 नांदगांव शहरातील येथील नमन शैक्षणिक संस्थेच्या लिट्ल स्टार व रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन,पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात झाला.सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष संजय बागुल उपाध्या सौ सरिता बागुल डॉ गणेश चव्हाण लिट्ल स्टार स्कूल च्या प्रिंसिपल सौ अनुराधा खांडेकर रेंबो इंटरनेशनल स्कूल च्या प्रिन्सिपॉल सुनीता सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.शालेय समिती शालेय समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.स्कूल च्या प्रिसिपल सुजता सूर्यवंशी,अनुराधा खांडेकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले

या वेळी मान्यवरांचा सत्कार झाला.स्वागतगीत,गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरवात झाली.संस्थेचे अध्यक्ष संजय बागुल म्हणाले,’ नांदगाव शहर व तालुक्यात पुढील काळात आधुनिक पद्धतीने आर्टिफिशियल इंटेलिजेंटच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाईल. संस्थेची अत्याधुनिक सर्वसोईयुक्त इमारत लवकरच उभी राहणार असून याचा फायदा तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थींना नक्कीच होईल.

या कार्यक्रमात चिमुकल्यांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे नृत्य व भक्तीपर गीते,मराठीगाणी,फॅशनशो,पोवाडे,नाटक,नारीशक्तीचा सन्मान, वैयक्तिक नृत्य यासह महाराष्ट्रातील विविध प्रकारची लोकनृत्ये सादर करण्यात आली.विविध प्रकारचे नृत्याविष्कार सादर करून विद्यार्थी कलाकारांनी सोहळ्याची रंगत वाढविली.शालेय विद्यार्थ्यांमधे आत्मविश्वास व सांघिक भावना वाढावी तसेच महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरांची ओळख लोककलेच्या माध्यमातून रुजवावी यासाठी या उद्देशाने हा कार्यक्रम संपन झाला विद्यार्थ्यांनी हे स्नेसंमेलन हे प्रेक्षकासाठी ही आगळी वेगळी पर्वणीच ठरली.दरवर्षी प्रमाणे या वर्षीही मोठ्या संख्येने पालकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून या संमेलनाचा आस्वाद घेतला

स्नेहसंमेलनाचे परीक्षणसं संस्थेच्या उपाध्या सरिता बागुल यांनी केले.नृत्य,कॉमेडी डान्स,संगीतमय,शिवरायांचे गीत,देशभक्तीपर गीतांवर नृत्यवर बालकलाकारांच्या अविष्काराने प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पालक, माता पालक, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.प्रमुख पाहुणे समाजसेविका अंजुंमताई कांदे,डॉ गणेश चव्हाण अँड विद्या कसबे यानी सहभागी विद्यार्थ्यांचे व शाळेचे तोंडभरून कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्कूलच्या विद्यार्थ्यांनी थोरात यांनी केले तर आभार शिक्षिका नेहा पाटिल यानी मानले या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता शाळेच्या संपूर्ण शिक्षकांनी तचेश शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम केले.तसेच विद्यार्थी व पालकांनी या कार्यक्रमाला उस्पूर्त प्रतिसाद दिला.

फोटो ओळ

नांदगाव / येथील नमन शैक्षणिक संस्थेच्या लिट्ल स्टार व रंबो इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात उत्कृष्ट नृत्य सादरीकरण केल्याबद्दल चिमुकली यास गौरविताना समाजसेविका सौ अंजुंताई कांदे अध्यक्ष संजय बागुल उपाध्या सौ सरिता बागुल डॉ.गणेश चव्हाण व डॉ.सौ चव्हाण अँड विद्या कसबे आदि

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.