ताज्या घडामोडी

अँड विद्याताई कसबे यांना शासनाच्या महिला बाल कल्याण विभागाकडून गोदाकन्या पुरस्कार…

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा

नांदगाव,ता ३ जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रमांतर्गत स्त्री व बालिकांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने काम करणाऱ्या देण्यात येणारा यंदाचा गोदाकन्या हा पुरस्कार येथील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अँड विद्या अभिमान कसबे यांना घोषित करण्यात आला आहे
उद्या ता ४ मार्चला नाशिकला विद्यानगर येथील दि.ए कुलकर्णी सभागृहात केंद्रीय आरोग्य आदिवासी राज्यमंत्री डॉ भारती पवार राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते अँड विद्या कसबे यांना गोदाकन्या पुरस्कार देण्यात येणार असून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची विशेष उपस्थिती त्यासाठी लाभणार आहे
याच सोहळ्यात स्त्री व बालिकांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने प्रगती करण्यासाठी,महिला व बालकल्याण विभाग,नाशिक तर्फे ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’आणि’लेक लाडकी योजना’या दोन महत्त्वपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून “नाशिकच्या गोदाकन्या” हे यशस्वी महिलांची यशोगाथा जगासमोर मांडणारे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे त्यात अँड कसबे यांच्या सोबतच संस्थात्मक पातळीवर गार्डा बाल सदन सह मालेगावच्या भावना निकम,नाशिकच्या भीमाबाई जोंधळे येवल्याच्या सुनीता खोकले,कळवण च्या लता पवार,देवयानी सोनार,दिंडोरीच्या कविता भोंडवे पेठच्या रोहिणी दुगल व रुचिरा ठाकूर यांनाही यंदाचा गोदा कन्या पुरस्कार बहाल करण्यात येणार आहे.
अँड विद्या कसबे यांनी ग्रामीण भागातील बाल विवाह कोरोना काळानंतर एकल महिलेचे उभे राहिलेल्या समस्या यावर आधार बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून तालुक्यात आपल्या कामाच्या मध्यातून प्रभावी असा ठसा उमटविला आहे अँड विद्या कसबे यांचे आमदार सुहासआण्णा कांदे सौ अंजुमताई कांदे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.