शिक्षिका अलका सुरेश नारायणे यांना वुमन रायझिंग स्टार अवॉर्ड २०२४जाहीर
जागतिक महिला दिनानिमित्त होणार वितरण

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा
नांदगाव ता.०४ दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने व कृतिका महिला बहुउद्देशीय संस्थेच्या सहकार्याने वुमन रायझिंग स्टार अवॉर्ड २०२३ या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम रविवार ( ता १०) रोजी नाशिक येथील पलास सभागृह गुरुदक्षिणा संकुल कॉलेज रोड नाशिक येथे दुपारी अडीच वाजता संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन नांदगाव येथील शिक्षिका सौ अलका सुरेश नारायणे यांना वुमन रायझिंग स्टार अवॉर्ड २०२४ या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.या पुरस्काराबद्दल के. पुं.पां.मवाळ विद्यालय पिंपरखेड संस्थेचे सरचिटणीस बापुसाहेब मवाळ, मुख्याध्यापक काशिनाथ गवळी,विद्यालयाचे शिक्षक वृंद,व म.सा.प शाखेचे पदाधिकारी व विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
या पुरस्कार समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकच्या लोकप्रिय पोलीस उपायुक्त माननीय मोनिकाजी राऊत. मिसेस इंडिया इंटरनॅशनल २०२४ ज्योती शिंदे.नाळ चित्रपटाच्या नायिका व लोकप्रिय अभिनेत्री देविका दप्तरदार.सामाजिक कार्यकर्त्या डॉ आशाताई पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या सोहळ्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कृतिका महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा कृतिका मराठे यांनी केले आहे



