“शेतकरी हा माझा आत्मा आहे” – आमदार सुहास आण्णा कांदे यांचा अतिवृष्टीग्रस्त भागात दौरा
"शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे; नुकसान भरपाईसाठी प्रयत्नशील राहीन" — आमदार सुहास आण्णा कांदे

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा
नांदगाव, ता. २९ — नांदगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर आज आमदार सुहास अण्णा कांदे यांनी साकोरा व न्यायडोंगरी गटातील गावांमध्ये जाऊन शेतमालाच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व त्यांना धीर देताना सांगितले, “शेतकरी हा माझा आत्मा आहे. मी आमदार म्हणून नव्हे,तर तुमचा सहकारी म्हणून सदैव तुमच्या पाठीशी आहे. नुकसान भरपाई आणि पीक विमा मिळावा यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करीन.”
या पाहणी दौऱ्यात साकोरा येथून सुरुवात करत तळवाडे,वेहेळगाव, आमोदे, बोराडे,जामदरी, कळमदरी,पळाशी, सावरगाव, न्यायडोंगरी, जळगाव बुद्रुक आदी गावांतील शेतकऱ्यांची भेट घेण्यात आली.
दौऱ्यात तहसीलदार सुनील सौदाने,गटविकास अधिकारी श्रीकिसन खताळे,तालुका कृषी अधिकारी डमाळे,तसेच संबंधित गावांचे सरपंच, ग्रामसेवक,तलाठी आणि शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी आमदार श्री कांदे यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या की, “नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याचे पंचनामे तात्काळ पूर्ण करा. कोणत्याही शेतकऱ्याची अडवणूक होणार नाही,याची खबरदारी घ्या.”
गावपातळीवरील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी देखील ग्रामपंचायतीच्या मदतीने शेतकऱ्यांना शक्य ती मदत करण्याचे आवाहन केले.
“शेतकरी हा माझा आत्मा आहे.अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान पाहून मन हेलावलं.तुमचं दुःख माझं स्वतःचं दुःख आहे.या संकटाच्या काळात मी आणि शिवसेना महायुती सरकार तुमच्यासोबत ठामपणे उभं आहोत. नुकसानभरपाई, पीकविमा यासाठी शासनदरबारी मी स्वतः पाठपुरावा करत आहे आणि याची तुम्हाला लवकरच मदत मिळेल,याची खात्री बाळगा.कोणत्याही शेतकऱ्याची अडवणूक होणार नाही,यासाठी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत.आपण धैर्य सोडू नका — मी तुमच्यासोबत आहे,आणि कायम राहीन.”
सुहास अण्णा कांदे, आमदार नांदगावं विधानसभा सभा