ताज्या घडामोडी

अमृत आभियानाय अंतर्गत सर्वोत्कृष्ट पुरस्कार नांदगांव पंचायत समितीला

नागापूर ग्रामपंचायत उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्काराने सन्मानित

गर्जा महाराष्ट्र २४ न्युज वृत्तसेवा

नाशिक ता.१३अमृत आभियानाय ३.० अंतर्गत सर्वोत्कृष्ट पुरस्कार नांदगांव पंचायत समितीला तर नागापूर ग्रामपंचायत उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अमृत महाआवास अभियान ३.० अंतर्गत २०२२/२०२३ अंतर्गत उत्कृष्ट काम करणार्या संस्था व्यक्तिंना महाआवास अभियान ग्रामीण पुरस्कार वितरण सोहळा दि.१२ मार्च २०२४ रोजी नियोजन भवनात सभागुह विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते सत्कार सोहळा संपन्न करण्यात आला.

अमृत आभियानाय ३.० अंतर्गत सर्वोत्कृष्ट पुरस्कार नांदगांव पंचायत समितीला तर तालुक्यातील नागापूर ग्रामपंचायतला उत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्काराने सन्मानित करण्यात आला.तेल कंपन्यांमुळे मोठा कर मिळत असल्याने श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून नागापूर ग्रामपंचायतीचा राज्यांत नावलौकिक आहे तसा विकासाच्या बाबतीतही तितकाच नावलौकिक आहे या ग्रामपंचायतीला यापूर्वी अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत राष्ट्रपती पारितोषिक,राज्य पातळीवरील निर्मलग्राम पुरस्कार व छोटे मोठे ४० पुरस्कार आतापर्यंत या ग्रामपंचायतीला मिळाले आहेत .त्यात विद्यमान सरपंच राजेंद्र पवार यांनी गावात केलेली भरीव विकासाची कामे होय. राजेन्द्र पवार हे वर्षांपूर्वी पहिल्यांदा सरपंच झाल्यानंतर त्यांनी गावाला राष्ट्रपती पुरस्कार मिळवून दिला होता त्यानंतर आता ते दुसऱ्यांदा पुन्हा लोकनियुक्त सरपंच झाल्यानंतर पुरस्कारांचा सिलसिला सुरू आहे एका मागून एक पुरस्कार स्वीकारण्याचा कार्यक्रम सुरू आहे .गावात अनेक विकासाची कामे करताना त्यांनी वैयक्तिक लाभाची मोठ्या संख्येने घरकुल गावात बांधल्यामुळे या ग्रामपंचायतीचा नाशिक विभागात तिसरा क्रमांक लागतो हा पुरस्कार विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा संचालक प्रतिभा संगमनेरे नांदगावचे कर्तव्य दक्ष गटविकास अधिकारी संदीप दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उपसरपंच विद्याताई देवरे,सदस्य पुष्पाताई पवार,ग्रामसेवक दिलीप निकम यांनी स्वीकारला यावेळी पंचायत समितीचे वरिष्ठ सहाय्यक दिनेश पगार घरकुल नांदगाव पंचायत समितीचे.घरकुल विभागाचे संजय आसान आदि उपस्थित होते,अमृत महाआवास आभियन अंतर्गत सर्वोत्कृष्ट पुरस्कार नांदगांव पंचायत समितीला तर नागापूर ग्रामपंचायतीला उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार मिळाल्याने तालुक्याचे आमदार सुहास आण्णा कांदे,जेष्ठ नेते बापुसाहेब कवडे यांनी अभिंदन करत शुभेच्या दिल्या आहेत.

महा आवास अभियान ३.०.अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट ग्रामीण
द्वितीय – कुशेगव तालुका इगतपुरी
तृतीय – नागोसली तालुका इगतपूरी

प्रधानमंत्री आवास योजनेत सर्वोत्कृष्ट काम करणारे तालुका
दिव्तीय क्रमांक – निफाड
तृतीय क्रमांक नांदगाव

राज्य पुरस्कृत आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत तृतीय – नागापूर तालुका नांदगाव
राज्य पुरस्कृत आवास योजना :सर्वोकृष्ट तालुका प्रथम क्रमांक- इगतपुरी,सर्वोत्कृष्ट,व्दितीय क्रमांक – बागलान

राज्य पुरस्कृत आवास योजना ग्रामीण विभागातील सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत
अंतापुर – बागलाण

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.