ताज्या घडामोडी

लेक लाडकी योजना अंतर्गत आता मुलींना मिळणार १ लाख १हजार रुपये ..!

नवजात बालिकेस टप्प्याटप्प्यात एक लाखापर्यंत मिळणार लाभ

गर्जा महाराष्ट्र २४न्यूज वृत्तसेवा

बाबासाहेब कदम

मुंबई ता.१८ महाराष्ट्र सरकार नेहमीच मुलींच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवित आहे.आता महाराष्ट्र सरकारने लेक लाडकी योजना राबवण्यास सुरुवात केली आहे.या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून,महाराष्ट्रात एक एप्रिल २०२३ पासून जन्मलेल्या मुलींना लेक लाडकी योजना अंतर्गत १ लाख १ हजार रुपये ची आर्थिक मदत दिली जाणार आहे.. या योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन नांदगाव पंचायत समितीच्या महिला व बालकल्याण विभगाच्या वतीने करण्यात आले आहे.

गरीब कुटुंबातील मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा तसेच मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, बालविवाह रोखणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर पाच हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये, सहावीत गेल्यावर सात हजार रुपये, अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये,१८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये, अशा रीतीने त्या मुलीस एकूण एक लाख एक हजार रुपये एवढा लाभ मिळेल

या आहेत अटी..

आई किंवा वडिलांनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. १ एप्रिल २०२३ पूर्वी मुलगी किंवा मुलगा आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. जुळ्या दोन्ही मुलांना स्वतंत्र लाभ देण्यात येईल.लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांच्या आत असणे गरजेचे आहे.

आवश्यक कागदपत्रे …

उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, आई आणि मुलीचे आधार कार्ड, मुलीचा जन्म दाखला,पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका,आई आणि मुलीचे संयुक्त छायाचित्र,आई आणि मुलीचे संयुक्त बैंक खाते इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

कसा मिळणार लाभ?

शासनामार्फत थेट लाभार्थी हस्तांतरण (डीबीटी) द्वारे लाभाची रक्कम लाभाथ्यांना अदा करण्यात येणार आहे.१ एप्रिल २०२३ नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या एक अथवा दोन मुलींना त्याचप्रमाणे एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल. दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल.

पाच टप्प्यात मिळणार १ लाख १ हजार रुपये :

रेशन कार्ड धारक कुटुंबातील जन्माला आलेल्या मुलींना प्रथम जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, ६ गेल्यावर सात हजार रुपये,अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये, अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये, अशा पद्धतीने एकूण मुलीस एक लाख एक हजार रुपये एवढा लाभ मिळणार आहे.ती रक्कम शासनामार्फत थेट लाभार्थीच्या बँक अकाउंट मध्ये जमा करण्यात येणार आहे

प्रतिक्रिया….

लेक लाडकी योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांनी आपल्या नजिकच्या अंगण वाडी केंद्रास भेट देत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करत लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्यावा.

. – प्राची पवार, प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी, पंचायत समिती नांदगाव

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.