ताज्या घडामोडी

बारा बलुतेदार महासंघाच्या धुळे जिल्हा कार्याध्यक्षपदी सुभाष लोहार यांची निवड

महाराष्ट्र राज्य उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठकित झाली निवड

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा

धुळे ता 28 : महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार महासंघाच्या धुळे जिल्हा कार्याध्यक्षपदी सुभाष लोहार यांची बिनिरोध निवड.

धुळे शहरातील संत गाडगेबाबा सभागृह एकवीरा देवी जवळ येथील सभागृहात नुकतीच उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठक संपन्न झाली.यावेळेस या बैठकीत बारा बलुतेदार महासंघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे, सरचिटणीस चंद्रकांत गवळी,कार्याध्यक्ष सतीश दरेकर,कोषाध्यक्ष साहेबराव कुमावत,उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष मुकुंदराव मेटकर,उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्याध्यक्ष एकनाथराव बोरसे,प्रवक्ता किसनराव जोर्वेकर यांचा प्रमुख उपस्थित संपन्न झाली यावेळी विविध विषयावर चर्चा व मार्गदर्शक करण्यात आले.प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय श्री विश्वकर्मा वंशीय समाज सेना, संचालक तथा श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्था शिरपूर माजी अध्यक्ष लोहार समाज मंगल प्रतिष्ठान धुळे अशा विविध सामाजीक संस्थेवर कार्यरत असलेले सुभाष माधवराव लोहार शिरपूर यांची धुळे बारा बलुतेदार महासंघ जिल्हा कार्यध्यक्षपदी निवड करण्यात आली.यावेळी सुभाष भाऊ लोहार यांना नियुक्ती बद्दल सन्मान करून शाल,श्रीफळ व नियुक्ती पत्र देण्यात आले या प्रसंगी राज्यभरातील बारा बुलतेदार महासंघाचे पदाधिकारी,सदस्य मोठया संख्येने उपस्थिती होते या निवडबद्दल नांदगाव तालुका सकल श्री विश्वकर्मा सुतार लोहार संघटनेच्या वतीने अभिनदन करण्यात आले आहे .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.