ताज्या घडामोडी

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाची ) पहिली यादी जाहीर

५ उमेदवारांची घोषणा ; आमदार निलेश लंकेंना संधी

गर्जा महाराष्ट्र 24न्युज वृत्तसेवा

मुंबई ता.30 लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. नगर दक्षिणमधून आमदार निलेश लंके यांना संधी देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) पक्षाने पहिली यादी जाहीर केली आहे.पहिल्या यादीत पाच उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे.या यादीत नगर दक्षिणमधून आमददार निलेश लंके तर बारामतीमधून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.आज मुंबईत पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली.

शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; ‘या’ पाच उमेदवारांची केली घोषणा
यामध्ये वर्धा – अमर काळे,
दिंडोरी – भास्कर भगरे,
बारामती – सुप्रिया सुळे,
शिरूर – डॉ. अमोल कोल्हे,
अहमदनगर – आमदार नीलेश लंके
हया मतदारसंघनिहाय उमेदवारांचा समावेश आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.