ताज्या घडामोडी

११ लाख घेऊन फरार झालेल्या रोखपालास पोलिसांनी २४ तासात केले जेरबंद

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा

नांदगांव ता.०५ शहरातील लक्ष्मीनगर येथील क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेडमधील कॅशियर संशयित आरोपी उमेश देशमुख याने भरणा करण्यासाठी आलेली ११ लाख ७७ हजार ७५० रुपये रक्कम बैंकेत न भरता परस्पर पळविल्याने नांदगाव पोलिसांनी २४ तासाच्या आत जळगाव जिल्ह्यातील चोपडा तेथे अटक करुन त्याच्या जवळून रोख रक्कम हस्तगत केल्याने पोलिसांच्या कामगिरीचे सर्वञ कौतुक होत आहे.

नांदगाव पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहिती अशी की नांदगांव येथील क्रेडीट एक्सेस ग्रामीण लिमिटेड नांदगांव येथील कार्यालयात कॅशियर पदावर असलेल्या संशयीत आरोपी उमेश देशमुख रा.आडावद ता.चोपडा (जळगांव) हा क्रेडीट एक्सेस ग्रामीण लिमिटेड.नांदगाव येथील कार्यालयात काम करीत असताना ३ एप्रिल रोजी नांदगांव कार्यालयात जमा केलेले ११,लाख ७७ हजार,७५ रुपये हे सदर बँकेत भरणा करणे आवश्यक असताना ते पैसे बँकेत न भरता अप्रामाणीक पणे स्वत:च्या फायद्या करता घेऊन पळून गेला,या संदर्भातील.फिर्यादी प्रवीण अशोकराव खंदार ता.नांदगांव यांचे फिर्यादीवरुन नांदगाव पोलिस स्टेनमध्ये गु र नं १५०/२४ कलम ४०९,४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.या कामी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने,अप्पर पोलीस अधिक्ष अनिकेत भारती,पोलिस उपअधिक्षक बाजीराव महाजन,यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांनी तात्काळ सदर गुन्हयाचे तपासकामी पोलिसांचे तपास पथक बनवुन आरोपीच्या शोधासाठी धुळे व जळगांव जिल्हयात पाठवुन आरोपीच्या मोबाईल नंबरच्या तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे शोध घेण्याच्या सूचना केल्या तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक संदीप बडे,
पोलिस उपनिरीक्षक.मनोज वाघमारे,पोलीस.हवालदर.विनायक वाघ,भारत कांदळकर,अलगट,गोपनीय शाखेचे कॉन्स्टेबल अनिल शेरेकर,दत्तु सोनवने,यांनी सापळा रचून संशयीतास २४ तासात चॊपडा येथे ताब्यात घेत अटक करुन त्याकडून संपुर्ण रक्कम हस्तगत करत नादगाव पोलिस स्टेशमध्ये हजर केले,संशयीत आरोपीने सदर रक्कम का पळविली याबाबत काही कारण पुढे आलेले नसून,वरील घटनेचा अधिक तपास नांदगांव पोलीस करीत आहे .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.