ताज्या घडामोडी

राज्यात चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामानाचा अंदाज

राज्यात सहा एप्रिलपासून अवकाळीचे संकट

गर्जा महाराष्ट्र 24न्युज वृत्तसेवा

मुंबई ता.०६ एप्रिल च्या आरंभी सूर्य तळपू लागल्याने उन्हाचा चटका चांगलाच तापदायक ठरत आहे.उन्हाचा चटका असह्य होऊ लागल्याने घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे.उकाडा मोठ्या प्रमाणावर वाढल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत तर दुसरीकडे शनिवार पासून महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.हवामान विभागाच्या अंदाजानुसार,मध्य महाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये ताशी 30 ते 40 किमी वेगाने तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

शनिवार आजपासून पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.शनिवार ते सोमवार पावसाचे प्रमाण जास्त राहील.सोमवारी विदर्भ,मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना येलो अलर्टही देण्यात आला.हवामान विभागाने शुक्रवारी नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील,असा अंदाज दिला होता तर शनिवारी व रविवारी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर,धाराशिव,लातूर आणि नांदेड तर खानदेशातली जळगाव,नंदूरबार आणि धुळे तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक,पुणे,सोलापूर,सातारा आणि सांगली. तसेच विदर्भातील यवतमाळ,चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.