ताज्या घडामोडी

खाजगी जागेवर शेतमाल खरेदी करणाऱ्या विरोधात बोलठाणसह जिल्ह्यात बारा ठिकाणी पथके नियुक्त

लेखापरीक्षणासह होणार चौकशी

गर्जा महाराष्ट्र 24 न्युज वृत्तसेवा

नांदगाव,ता १३ बेकायदेशीर पध्दतीने खाजगी जागेवर शेतमाल लिलाव सुरु केले असल्याचे नोंद घेऊन संबंधीतांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी सदर शेतमाल खरेदी केंद्राच्या कामकाजाची तपासणी करण्यासाठी पथकाची नेमणूक केली आहे

या पथकात जिल्ह्यातील सहकार विभागाचे सहायक निबंधक तालुक्यांचे लेखापरीक्षक व संबंधित बाजार समित्यांच्या सचिवांचा समावेश करण्यात आला असून या पथकाकडून खाजगी जागेवर खरेदी करण्यात आलेला मालखरेदीचा तपशील संकलित करण्यासोबत या खरेदीदाराकडे वैध परवाना आहे अथवा नाही महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन), अधिनियम, १९६३ चे कलम ७ व ५ (ड) नुसार परवाना घेतल्याशिवाय कोणत्याही खरेदीदाराला शेतकऱ्यांकडून थेट शेतीमाल खरेदी करण्याची परवानगी नाही. कलम ५ (ड) तरतुदीनुसार थेट पणन करण्यासाठी किंवा खाजगी बाजार स्थापन करण्यासाठी मा. पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालयाकडून थेट पणन / खाजगी बाजाराचा परवाना घेणे आवश्यक आहे. तसेच कलम ६ (२अ) मधील तरतुदीनुसार फळे व भाजीपाला बाजार आवाराच्या बाहेर खरेदी करण्यासाठी, कलम ५ (ड) मधील तरतुदीनुसार थेट पणन परवाना घेणे आवश्यक आहे. तसेच कलम ३१ मधील तरतुदीनुसार शेतीमाल खरेदीदाराने बाजार क्षेत्रातील शेतीच्या उत्पन्नाच्या खरेदीवरील शासनाने निश्चित केलेल्या दराने बाजार फी व कलम ३४ (अ) मधील तरतुदीनुसार देखरेख खर्च देणे आवश्यक आहे.शेतमाल खरेदी विक्री केंद्रातील खरेदीदार / व्यापारी यांचेकडे वैध परवाना आहे का? तपासणी दिनांकाअखेर सदर केंद्रावर झालेली एकूण शेतमाल खरेदी.;खरेदीदार / व्यापारी यांनी बाजार फी. देखरेख खर्च खर्च (सुपरव्हीजन कॉस्ट) भरणा केलेला आहे का ? तपासणी दरम्यान आढळून आलेल्या अन्य नियमाबाहय बाबी.या बाबी नियुक्त करण्यात आलेल्या पथकाकडून तपासल्या जाणार आहेत

जिल्हा उपनिबंधकांच्या जिल्ह्यातील बाजार समिती व्यतिरिक्त खाजगी जागेवर शेतमाल खरेदी करणाऱ्यांचे धाबे मात्र दणाणले आहे जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील बोलठाण लासलगाव येथील विनियरा फार्म्स प्रोड्युसर्स बागलाण तालुक्यातील दोन केंद्रे उमराणे येथील शेतकरी राजा खरेदीविक्री केंद्र निफाड च्या सायखेडा व्यापारी असोशियन सिन्नर तालुकयातील नायगाव दिंडोरी तालुक्यातील वणी,चांदवडमनमाड कळवण देवळा अंदरसूल या बारा ठिकाणच्या केंद्राची तपासणी करणाऱ्या पथकात एकूण चौतीस जणांचा समावेश करण्यात आला

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.