ताज्या घडामोडी

माजी आमदार संजय पवार यांच्यासह जुन्या शिवसैनिकांचा सत्कार

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा

नांदगाव,ता ११ माजी आमदार संजय पवार यांनी आज तालुक्याचे जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांची सदिच्छा भेट त्यांचे शुभार्शिवाद घेतलेत श्री बापूसाहेब कवडे यांनी शिवसेनेतील कधीकाळी एकत्रित काम केलेल्या माजी शिवसैनिकांच्या या गाठीभेटीबद्दल आनंद व्यक्त करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी २००४ च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन विद्यमान आमदार असलेल्या अँड अनिल आहेर यांच्या ऐवजी शिवसेनेच्या संजय पवार यांची पाठराखण करण्याचा निर्णय घेतला व मतदार संघाचे राजकीय चित्र बदलले या काळात सोबत असलेल्या शिवसैनिकांनी महत्वाची भूमिका बजाविली होती माजी आमदार संजय पवार यांनी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता त्यानंतर आज संजय पवार यांनी आज जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांची भेट घेत त्यांचे शुभार्शिवाद घेतले श्री बापूसाहेब कवडे यांनी माजी आमदार संजय पवार यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी माजी शिवसैनिक जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ शोभाताई कवडे तालुका पंचायत समितीचे माजी सभापती सुधीर देशमुख,शिक्षक नेते विष्णू निकम,बाजार समितीचे माजी सभापती तेज कवडे मनमाडचे माई नगराध्यक्ष योगेश पाटील समाधान हिरे सुदाम कवडे पोपट साबळे आदी उपस्थितीत होते

फोटो ओळी
बाणगाव बुद्रुक:- माजी आमदार संजय पवार यांचा सत्कार करताना विष्णू निकम शेजारी जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे सुधीर देशमुख माजी सभापती तेज कवडे, योगेश पाटील आदी

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.