ताज्या घडामोडी

माजी आमदार संजय पवार यांचा शिवसेनेत प्रवेश; आमदार सुहासआण्णा कांदे यांनी माजी आमदारांची एकजूट वर्षभरात मोडीत काढली

गर्जा महाराष्ट्र 24न्युज वृत्तसेवा

नांदगाव,ता ६ माजी आमदार संजय पवार यांनी आज सांयकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतला मंत्री छगन भुजबळ यांनी आरक्षणाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करीत काही दिवसांपूर्वी मंत्री छगन भुजबळ यांची साथ सोडण्याचा निर्णय घेत आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या सोबत राहण्याचा निर्णय जाहीर केला होता मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिल्यावर संजय पवार यांनी कुठल्याही पक्षात जाण्याबाबतचा अधिकृत निर्णय घेतला नव्हता मात्र आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या नेतृत्वाखाली मतदार संघात काम करण्याचे धोरण स्वीकारले होते आज सांयकाळी मुबंईत बाळासाहेब भुवन येथे माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या सोबत झालेल्या शिवसेना प्रवेश सोहळ्यात त्यांनी आपल्या प्रवेशावर अधिकृत शिक्कामोर्तब केले

संजय पवार यांचा शिवसेनेतील प्रवेशासाठी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी याबाबतचा पुढाकार घेतला. मनमाड बाजार समितीत माजी खासदार समीर भुजबळ व माजी आमदार संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली पॅनल विजयी झाले होते मात्र या सत्ताबदलात श्री.भुजबळ यांच्या निकटवर्तीयांनी आपल्याला सभापती म्हणून काम करू दिले नाही असा आरोपही माजी सभापती माजी आमदार संजय पवार यांनी सहा महिन्यापूर्वी केला होता तर दुसरीकडे गेल्या वर्षी नांदगाव मतदार संघातील पाचही माजी आमदार सुहासआण्णा कांदे यांच्या विरोधात एकवटले होते मात्र ही एकजूट वर्षभरातच मोडीत निघाली सुरुवातीला माजी आमदार राजाभाऊ देशमुख यांनी व आता संजय पवार यांनी साथ सोडली पंकज भुजबळ हे राष्ट्रवादी अजितदादा गटासोबत गेल्याने ते महायुतीत आहेत आता माजी आमदार अँड जगन्नाथ धात्रक व माजी आमदार अँड अनिल आहेर हे दोघे महाआघाडीच्या सोबत आहेत माजी आमदारांची ही एकजूट दीर्घकाळ टिकेल असा होरा होता मात्र अवघ्या सात आठ महिन्यातच माजी आमदारांची ही एकसंधता मोडीत अशा रीतीने मोडीत निघाली आपण लहानपणापासून भगवा झेंडा खांदयावर घेतला आहे विद्यमान आमदार सुहासआण्णा कांदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवित आपण हा पक्षप्रवेश घेतला अशी प्रतिक्रिया संजय पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर दिली

फोटो ओळी
मुबंई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नांदगावचे माजी आमदार संजय पवार यांनी आज शिवसेनेत प्रवेश घेतला आमदार सुहास आण्णा कांदे , शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी मंत्री दादा भुसे बबनराव घोलप डॉ.नीलम गोऱ्हे खासदार हेमंत गोडसे आदी

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.