ताज्या घडामोडी

नांदगाव – मनमाड रस्त्यावर दुचाकी टेम्पोवर आदळून एक ठार, एक जखमी

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा

नांदगाव : ता.०६ नांदगाव-मनमाड रस्त्यावर हिरेनगर फाट्याजवळ दुचाकीच्या अपघातात एकजण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत नांदगाव पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,नांदगाव शहरातील रेल्वे कॉलनीत राहणारे शुभम निकम व सुमित निकम हे दोघे चुलतभाऊ गुरुवारी ता. ४) ला रात्री सात च्या दरम्यान मोटारसायकलने (एमएच ४१ एआर ५१४७) मनमाड येथून नांदगावकडे येत असताना हिरेनगर फाट्याजवळ नादुरुस्त अवस्थेत उभा असलेल्या टेम्पोवर (एम एच ०४ एफडी ३२९२) त्यांची दुचाकी आदळली.त्यात शुभम वसंत निकम हा जागेवर ठार झाला, तर चुलत भाऊ सुमित मधुकर निकम गंभीर जखमी झाला. याबाबतची खबर नांदगाव पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी पोलिस उपनिरीक्षक मनोज वाघमारे हवालदार विनायक जगताप गोपनीय शाखेचे दत्ता सोनवणे,आनिल शेरेकर,पोलिस शिपाई,नंदू चव्हाण तात्काळ घटनास्थळी दाखल होत जखमी ला नांदगाव च्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.सुमित निकम यास पुढील उपचारासाठी मालेगाव रुग्णालयात पाठविण्यात आले.सुमित मधुकर निकम यांच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास नांदगाव पोलीस करत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.