ताज्या घडामोडी

विजांच्या कडकडाटसह नांदगाव शहर व तालुक्यात बेमोसमी पावसाचा धुमाकूळ…

गर्जा महाराष्ट्र 24 न्युजवृतसेवा

नांदगाव ता.12 हवामान खात्याच्या अंदाजानुसार शनिवारी (ता.11 ) रोजी रात्री ९ वाजता नांदगाव शहर व तालुक्यात सोसाट्याचा वारा सुटून जोरदार वाऱ्यासह विजेच्या कडकडंसह जोरदार बेमोसमी पावसाने हजेरी लावली.

शनिवारी दिवसभर कडक उन्हाच्या उकाड्यानंतर नांदगावशहर सह ग्रामीण भागात बाणगाव,साकोरा,हिसवळ,कासारी, लक्ष्मीनगर, मोरझर आदी भागात शनिवारी ( तां.11 ) रोजी रात्री साडे आठ – नऊच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकाटासह पावसाला सुरुवात झाली तब्बल दोन तास जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला रात्री साडेअकरा पर्यंत काही भागात पाउस पडत होता

जोरदार बेमोसमी पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी साचले आहे या बेमोसमी पावसामुळे नांदगाव शहर तालुक्यातील अनेक ठिकाणी रातभर विजप्रवाह खंडित करण्यात आला होता

झाडे पडले पत्रे उडाली…..
या पावसामुळे गावरान आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच साकोरा येथे पोल्ट्री शेडमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने येथील ७ ते ८ पोल्ट्री धारकांचे हजारो कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहे दहेगाव रोडवरील कांद्याचे शेड कोसळून कांदाचे नुकसान झाले आहे

काही भागांत दुष्काळी परिस्थितीत होणारं लाभ….
साकोराकरना संजीवनी ठरणारा मोरखडी बंधारा अर्धा भरला असून परिसरातील नालाबल्डींग फुल झाल्या असून.. विहिरीना उतरले पाणी.. उतरणार आहे.

पावसाची हजरी…

समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीपर्यंत चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे तसेच चक्रीय वारा क्षेत्रापासून दक्षिण आसाम मधील अपंग व सिल्वचर पर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीपर्यंतच्या पातळीत पूर्व पश्चिम पसरलेल्या हवेचा कमी दाबाचा आज तयार झाला आहे यामुळे अवकाळी व गारपीटीचे वातावरण तयार झाल्याने हवामान तज्ञांचे मत आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.