मतदान जनजागृतीसाठी नांदगावला नगरपालिकेच्या वतीने “लोकशाही चषक ” चे आतोजन
नांदगाव ला मतदान जनजागृती सप्ताहाचे आयोजन

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा
नांदगाव तां.१० उत्सव लोकशाहीचा सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ निमित्ताने नाशिक जिल्हयात जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून संपुर्ण जिल्ह्यात ८ मे २०२४ ते १४ मे या कालावधीत मतदान जनजागृतीचा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, या अंतर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत.

दिंडोरी लोकसभा मतदासंघाची निवडणूकीची.मे महिन्यात मतदान प्रक्रिया होणार आहे.त्यादृष्टीने जिल्हा निवडणूक विभागातर्फे विविध कार्यक्रम अंतर्गत मतदार जनजागृतीपर कार्यक्रम लोकसभा मतदार संघात घेतले जात आहे. याचाच एक भाग म्हणून नांदगाव शहरात नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धासाठी लोकशाही चषकाचे आयोजन करण्यात आले होते.


यामध्ये क्रिकेट,कबड्डी, हॉलीबॉल ,बुद्धिबळ, कॅरम, टेबल टेनिस, धावण्याची शर्यत, चित्रकला,रांगोळी, मेहंदी,उखाणे स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्कयात आले होते.


या उपक्रमा मध्ये शहरातील जे.टी कासलीवाल,के.एम कासलीवाल,व्ही.जे.हायस्कूल ,नेसा क्रिकेट अकॅडमी ,खाजगी क्लासेस, भजनी मंडळ,महिला बचत गट व नागरिक यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोदवला.स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रशासक तथा मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी उपस्थित नागरिकांना मतदान जनजागृती बाबत आवाहन केले.तसेच प्रमुखातिथी डॉक्टर गणेश चव्हाण यांनी उपस्थित खेळाडूंना व नागरिकांना मार्गदर्शन केले.

**लोकशाही चषकचे विजेते
खेळाचा प्रकार
क्रिकेट – नेसा अकेडमी (विजेते),के.एम.के.विद्यालय
(उपविजेते ) रनिग रेस (मुली) १)गार्गी पंकज पाटील २) मेघा अमोल जगधने ३.गौरी मच्छिंद्र काकळीज K M K रनिग रेस (मुले)१) यशवंत बापू शिंदे २)वैभव रामदास बावणे ३) पियुष सुनील किरकिरे K M K School व्हॉलीबॉल विजेते मुली के.एम.के. विद्यालय (विजेते) ,व्ही.जे.हायस्कूल (उपविजेते ) व्हॉलीबॉल विजेते मुले व्ही.जे . हायस्कूल (विजेते) के.एम.के. विद्यालय (उपविजेते ), कबड्डी (मुले) के.एम.के. विद्यालय (विजेते) व्ही.जे.हायस्कूल (उपविजेते )
कबड्डी (मुली) के.एम.के. विद्यालय (विजेते),व्ही.जे.हायस्कूल (उपविजेते )टेबल टेनिस मुली १)श्रावणी प्रमोद गायकवाड २)वैष्णवी प्रवीण पाटील ३)क्रांती कैलास इंगळे JTK EMS
टेबल टेनिस मुले १) साईप्रसाद प्रकल्प पाटील २)लाव्या नीरज कासलीवाल ३)सय्यद मोहम्मद कामरान JTK
बुद्धिबळ १)आर्यन उत्तम पावरा २)सर्वेश गजेंद्र माताडे JTK EMS
कॅरम १)सार्थक राहुल सिसोदिया प्रथम २)तन्मय प्रमोद जाधव द्वितीय JTK EMS
नाटक -तनिष्का परदेशी अनुष्का नगरे
रांगोळी – मयुरी महिरे,अस्मिता शिंदे,शुभांगी औशिकार
चित्रकला – भाग्य्श्री वाघ,दीक्षा सूर्यवंशी,धनश्री पगारे
मेहंदी – महेश्वरी मिटकरी, ख़ुशी कलंत्री, गुड्डी थोरात
नृत्य – १).गिरीजा वाघमारे निरीजा वाघमारे २)अनुश्री पवार ३. शुतेश्वी शेळके
नृत्य – मोठा गट – रतना वाबळे .
उखाणे – भारती कलंत्री


स्पर्धेचे परीक्षक म्हून काम डॉ.गणेश चव्हाण,क्रीडा शिक्षक अशोक बागुल,संजय त्रिभुवन,नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकारी सौ .मुक्ता कांदे यांनी पहिले शरद पवार मुख्याध्यापक के.एम.के.विद्यालय मनी चावला (प्राचार्य जे.टी.के.विद्यालय,मिलिंद कायस्थ,श्रीमती देवरे,व्ही.जे. हायस्कूल,मुक्ता कांदे प्रशासकीय अधिकारी,राहुल कुटे कर निरीक्षक,यांनी प्रास्ताविक केले आनंद महिरे प्रकल्प अधिकारी,यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.निलेश देवकर, सुनील पवार,नावेद शेख शहर समन्वयक,विजया धनवट,नारायण कोटमे, उमेश गायकवाड, जितेंद्र कटारे,उषा शिंदे,ज्योती परदेशी यांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.



