ताज्या घडामोडी

राज्यात पावसाचा इशारा

विदर्भात जोरदार पाऊस

गर्जा महाराष्ट्र 24न्युज वृत्तसेवा

पुणे तां.10 गुरुवारी मध्य महाराष्ट्र,मराठवाडा व विदर्भातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पंडला आहे. राज्यात पुढील काही दिवस मध्य महाराष्ट्र,मराठवाडा व विदर्भात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस,सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.त्यानंतरही पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान,.मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या परिसरात वाऱ्याची एक चक्रीय स्थिती समुद्रसपाटीपासून १.५ किमीपर्यंत दिसून येत आहे.चक्रीय स्थितीपासून वाऱ्याची द्रोणीय रेषा दक्षिण कर्नाटकपर्यंत आहे.आणखी एक वाऱ्याची द्रोणीय रेषा वायव्य राजस्थानपासून पश्चिम विदर्भापर्यंत जात आहे. त्यामुळे राज्यात पावसाला अनुकूल वातावरण तयार झाले आहे.

गुरुवारी नागपूर येथे ५० मि.मी. इतका विक्रमी पाऊस पडला आहे.पाऊस व ढगाळ हवामानामुळे राज्यातील तापमानात घट झाली आहे.अनेक भागांतील तापमान ४० अंशांच्या आत आले आहे. राज्यात अकोला येथे ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर सर्वात कमी तापमान महाबळेश्वर येथे १८.९ अंश सेल्सिअस इतके होते. येत्या १० ते १३ मेदरम्यान मध्य महाराष्ट्र,मराठवाडा व विदर्भात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस, सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशारा आहे.तर कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.