ताज्या घडामोडी

नांदगावला तपासणी केंद्रावर निवडणूक खर्च निरीक्षकांच्या पथकाची भेट

खानदेश-मराठवाडा सीमेवरील कासारी तपासणी केंद्राची पाहणी

गर्जा महाराष्ट्र 24 न्युज वृत्तसेवा

नांदगाव, ता. २९ :लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदगांव तालुक्यातील कासारी,न्यायडोंगरी व मनमाड या तीन ठिकाणी तपासणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.जळगाव व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांच्या सीमेवर तालुक्याची,पर्यायाने जिल्ह्याची हद्द संपत असल्याने या मार्गाने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ लक्षात घेत निवडणूक विभागाने तपासणी केंद्रे नुकतीच कार्यान्वित केली आहेत.या सीमेवर कडक तपासणी मोहीम सुरू झाली आहे.

तपासणी केंद्राजवळ बॅरिकेट्स उभारण्यात आली असून,पोलिसांसह निवडणूक शास्त्र कर्मचाऱ्यांच्या पथकाची याठिकाणी नियुक्ती करण्यातआली आहे.दिवस-रात्र वाहनांची कसून तपासणी केली जात असून,त्या तपासणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंगदेखील केले जात आहे.निवडणूक काळात उमेदवारांकडून मतदारांना पैशांची लालूच दाखविणे,आदर्श आचारसंहितेचा भंग होईल जशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने खासगी वाहनांची कसून तपासणी करण्यात येते,

केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक मुकंबीकेयन,एस यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघासाठी कार्यान्वित असलेल्या कासारी, न्यायडोंगरी व मनमाड येथील तपासणी केद्रांची नुकतीच पाहणी केली नाशिक जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची कडक तपासणी करावी, त्याचे चित्रीकरण करून नोद रजिस्टाला घ्यावी,चारचाकी वाहनाच्या डिक्कीसह वाहनाच्या सीटजवळील भागसुद्धा तपासावा.यात असणाऱ्या बॅग्ज आणि इतर बाबींची तपासणी करावी.काही आक्षेपार्ह आढळल्यास त्याबाबत संबंधित यंत्रणेोलर माहिती द्यावी. पूर्णपणे खात्री झाल्यावरच संबंधित वाहनाला प्रवेश द्यावा,तसेच, तालुक्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रात्री-बेरात्री चेकपोस्टवर अचानक भेट द्यावी, असे निर्देश निवडणू‌क खर्च निरीक्षक मुकंबीकेयन.एम यांनी तपासणी पथकाला दिले.

यावेळी त्यांच्यासमवेत नांदगाव विधानसभा मतदार संघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेखा चव्हाण,मनमाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी आबासाहेब महाजन,तहसीलदार सुनील सैदाने,करविभागाचे उपयुक्त अनिल हिरे,नांदगावचे पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी,मनमाडचे पोलिस निरीक्षक श्री.घुगे,निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार चेतन कोणकर आदी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.