ताज्या घडामोडी

बकरी ईद शांतेत साजरी करा – तहसिलदार सुनिल सैदाने

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा

नांदगाव ता.14 बकरी ईदच्या अनुषंगाने नांदगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शुक्रवारी. १४ रोजी वाजता पोलीस स्टेशन मध्ये शांतता समिती सदस्य,नांदगाव पालिकेकडीलअधिकारी, मुस्लीम बांधव यांची संयुक्तपणे शांतता कमिटी बैठक आयोजित केली होती.

बैठकीची प्रस्तावना पोलिस निरीक्षक प्रतिम चौधरी यांनी बैठक आयोजन करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला.त्यानंतर बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य व इतरांनी समस्या / सुचना मांडल्या.त्यानंतर सदर सुचनेचे नगपालिकेचे अधिकारी यांनी सदर समस्या सोडविण्यात येतील असे सांगितले.

. उत्सव साजरा करताना कायदेशीर बाबींचे उल्लंघन होता कामा नये, कोणीही कायदा हातात घेऊ नये,सोशल मिडीयावर कोणीही आक्षेपार्ह मेसेजेस,फोटो, पोस्ट व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत त्वरीत पोलीस यंत्रणेस कळवावे,कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलीसांशी संपर्क साधावा,शांतता समिती सदस्य व नागरीकांनी आपल्या परीसरातील बेकायेदशीर बाबींची माहिती पोलीसांना दिली पाहिजे. नियमांचे पालन करावे,असे आव्हान तहसिलदार सुनिल सैंदाने यांनी केले व बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या.

सदर बैठकीस पोलीस निरिक्षक प्रितम चौधरी नगरपालिकेचे आधिकरी अरूण निकम, बंडू कायस्थ,गोपनीय शाखेचे पोलीस अंमलदार, दत्ता सोनवणे,दिपक मुंडे व पत्रकार व शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.