ताज्या घडामोडी

लिट्ल स्टार, रेंबो इंटरनेशनल स्कूल मध्ये पहिल्या दिवशी चिमुकल्यांचे जंगी स्वागत

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा

नांदगाव ता.१४ नांदगाव शहरात नमन एज्युकेशन संस्थेच्या लिटल स्टार इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये शाळा प्रवेशाचा पहिला दिवस मोठ्या जलोषाशात साजरा झाला स्कुलच्या वतीने विविध उपक्रम राबविले.

लिटल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पहिल्या दिवसी चिमुकल्यांच्या स्वागता साठी प्रवेशद्वारावर स्वागत कमान उभारण्यात आली होती आकर्षक सजावट आनंददायी वाद्यसंगीत च्या निनादा सह चिमुकल्या चे स्कुलच्या शिक्षिकानी चिंमुकल्याचे औक्षण केले स्कुलचे अध्यक्ष संजय बागुल व उपाध्यक्षा सरिता बागुल यांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देत त्यांचे स्वागत केले

या उत्साही वातावरणात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय बागुल उपाध्यक्षा सरीता बागुल प्रिंसिपल स्मिता सुर्यवंशी यांनी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन केलें

व नवगतांचे स्वागत केले. उन्हाळ्याच्या सुटीच्या दोन महिन्याच्या खंडानंतर शालेय संस्थाचे विश्वस्त विद्यार्थी,पालक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचा उत्साह ओसांडून वाहत होता.यावेळी नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल,उपाध्यक्ष सरिता बागुल यांनी मुलांना चॉकलेट वाटप केले यावेळी चिमुकल्यांनी सेल्फी पॉइंटवर सेल्फी घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेंनबो इंटरनॅशनल स्कूल प्रिन्सिंपल स्मिता सुर्यवंशी यांनी केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.