ताज्या घडामोडी

लिटल स्टार इंग्लिश स्कुल मध्ये चिमुकल्यानी केले पितृ पूजन …

गर्जा महाराष्ट्र२४ न्यूज वृत्तसेवा

नांदगाव ता.१७ आजच्या काळात आई – वडिलांचे महत्व कमी होत असून सध्या वृद्धाश्रमाची संख्या वाढत चालली आहे ही बाब गँभीर असून मुलांच्या लहान वयातच त्यांच्या मनात संस्काराची बीजे रोपण करणे गरजेचे आहे त्याच्या मनात आई वडीलांबद्दल आदराची भावना रुजावी या दृष्टिकोनातूनच स्कुल मध्ये मातृ-पितृ दिन साजरा होणे महत्वाचे आहे असे प्रतिपादन नमन शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय बागुल यांनी पितु दिनी केले.


कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने केली पुरोहित प्रसाद गरूजी यांच्या विधिवत मंत्रोच्चारा च्या जयघोषात विद्यार्थ्यांनी प्रथम माता व पिता यांचे पाद्यपूजन करून औक्षण केले तसेच त्यांना भेटवस्तू दिल्या.आई वडीला विषयी प्रेम व्यक्त करणाऱ्या गीतांवर विद्यार्थ्यांनी ,नृत्य सादर केले तसेच उपस्थित पालकांनी आपल्याला चिमुकल्या सोबत नृत्य सादर केले

. यावेळी उपस्थितीत पालकांमधून बाबासाहेब कदम,दशरथ शिंदे यांनी आपल्या मनोगतातून लिटल स्टार इंग्लिश स्कुल ही संस्कारक्षम स्कुल आहे हे वक्तव्य व्यक्त केले.तसेच पाश्चत भाषेतून शिक्षण घेत असताना ही आपली मराठी संस्कृती टिकविणे ही तितकेच महत्वाचे आहे अशी भावना व्यक्त केली

यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद अश्रू आपल्या वडिलांबद्दल ची भावना सांगून जात होती या कार्यक्रमास नमन शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय बागुल उपाध्यक्ष सरिता बागुल प्रिन्सिपल स्मिता सूर्यवंशी पत्रकार बाबासाहेब कदम पालक, माता पालक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.