ताज्या घडामोडी

वीज पडून झालेल्या जिवीत हानीचे पंचनामा करण्याचे आमदार सुहास आण्णा कांदेंनी दिले आदेश

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा

नांदगाव ता.२५-: तालुक्यातील जामधरी शिवारातील गोपाळा नामक परिसरात सोमवारी ता.२४ रोजी दुपारी वीज कोसळून दोन शेळ्या व एका मेंढ्याचा मृत्यू झाला. तर मेंढपाळ किरकोळ जखमी झाल्याची दुर्देवी घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच आमदार सुहास आण्णा कांदे यांनी तत्काळ तहसीलदारांना पंचनामा करण्याच्या सूचना केल्या. व मदतीबाबत प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे.

सोमवारी ता.२५ दुपारी अचानक जोरदार पाऊस सुरु झाला, त्यावेळी भिकाजी तांबे यांच्या शेळ्या, मेंढ्या या परिसरात चरत होत्या. यावेळी या मेंढ्यावर वीज कोसळली त्यात दोन मोठ्या शेळ्या, एक नर मेंढा जागीच ठार झाले. तर जवळ असलेला सोनू गोटे हा किरकोळ भाजला. या घटनेची माहिती मिळताच आमदार.सुहास आण्णा कांदे यांनी प्रतिनिधी राजेश शिंदे यांना पाठवून घटनेची माहिती घेतली. व तहसीलदार सुनिल सैदाने याना सूचना केल्या आहे. तलाठी श्रीखंडे यांनी तात्काळ घडलेल्या घटनेचा पंचनामा करून तहसीलदार सुनील सौंदाणे यांना सादर केला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.