नांदगावला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे व स्मारकाचे लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न
हमालवाडा परिसराचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा
नांदगाव ता.०६ भुजात बळ असणाऱ्यांनी अनेक वलग्ना केल्या,घरात मंत्री, खासदार,आमदार असतानाही पुतळ्याच्या परवानगी आणणे सोपी गोष्ट नाही असे सांगत अपमानास्पद वागणूक दिली.मात्र माझ्यासारख्या सामान्य माणसाला तुम्ही मतरूपी आशीर्वाद देऊन आमदार केले,म्हणून आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा बसवण्याचे भाग्य मला लाभले असे प्रतिपादन आमदार सुहास कांदे यांनी केले.

. नांदगाव शहरातील शनि मंदिर पुलावर असलेल्या बगीच्यात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक उभारून देईन असा शब्द आमदार सुहास आण्णा कांदे यांनी धनगर समाजाला विधानसभा निवडणुकीत दिला होता.त्याची आज पुतळा बसवून शब्दपूर्ती झाली.त्यावेळी या दिमाखदार सोहळ्यात आमदार सुहास कांदे बोलत होते.

व्यासपीठावर होळकर यांचे वंशज मुकुंदराजे होळकर,त्यांच्या सविद्य पत्नी सुलोचना होळकर,मनमाडचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना तालुकाप्रमुख शाईनाथ गिडगे,महेंद्र दुकळे,माजी नगराध्यक्ष राजेश कवडे,शिवाजी पाटील,माजी सभापती विलास आहेर,समाजसेविका सौ.अंजुमताई कांदे,बापूसाहेब शिंदे,बाजार समिती सभापती सतीश बोरसे, जिल्हाप्रमुख श्रद्धा कुलकर्णी,सोनिया सोर,बबलू पाटील,पिंटू शिरसाठ,राजेश शिंदे, बिरू शिंदे,राजाभाऊ पगारे, मच्छिन्द्र बिडगर,सविता गिडगे,मयूर बोरसे, आदी उपस्थित होते.

. अगोदरच्या वक्त्यांनी राजमाता अहिल्यादेवीचा पुतळा बसवण्याची मागणी ४० वर्षांपासूनची होती.अनेकांनी यावर खोटी आश्वासने देत धनगर समाजाची फसवणूक केली.असे मनोगत व्यक्त केले होते. त्यावर बोलताना आ. श्री सुहास कांदे यांनी त्या करंट्याच्या नशिबात राजमातेचा पुतळा बसवण्याचे भाग्य नव्हते.मी आमदार होईपर्यंत त्यांना साध्या पुतळा बसवण्याच्या परवानग्या आणता आल्या नाहीत.या उलट हा प्रश्न घेऊन त्यांच्या घरी गेलेल्या शिष्टमंडळाला अपमानित व्हावे लागले होते.पण भगवान शिवशंकराच्या निस्सीम भक्त असलेल्या राजमाता अहिल्यादेवीचा पुतळा उभारण्याचे दैवी काम माझ्या हातून झाले.म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो.राजमाता अहिल्यादेवीनी देशातील ११ व नेपाळ मधील पशुपतीनाथ अशा १२ ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला.तसेच राज्यातील सर्व ठिकाणच्या शिवमंदिरे व हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार ही राजमाता अहिल्यादेवीनी केला. त्याचबरोबर गावोगावी पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी खोदून दिल्यात.आणि शिवभक्त मातेचा पुतळा स्मारक लोकार्पण करताना विशेष आनंद आहे.असे ही आ. श्री कांदे म्हणाले.

. या क्षेत्राचे पावित्र्य राखणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. यापूर्वी जसा मतदान रुपी आशीर्वाद दिला.तो कायम असू दया.आपल्यासाठी म्हणा किंवा मतदार संघातील प्रत्येक व्यक्तीसाठी मग तो कुठल्याही जातीधर्माचा असो माझ्या घराचे दरवाजे सतत उघडे आहेत. राजमाता अहिल्यादेवीची शपथ घेऊन सांगतो मला निवडून दिल्याचा तुम्हाला कधीच पश्चाताप होऊ देणार नाही.असे भावनिक उदगार ही आ. श्री कांदे यांनी काढले.

. यावेळी होळकर यांचे वंशज मुकुंदराजे होळकर यांनी ही मनोगत व्यक्त करताना आमदार सुहास कांदे यांच्या विकासकामांची व राजमाता अहिल्यादेवीचा पुतळा बसवण्याचे महान कार्य केल्याबद्दल गौरव केला.या पद्धतीचे मनोगत समाजसेविका सौ.अंजुमताई कांदे यांच्यासह महेंद्र दुकळे, शाईनाथ गिडगे यांनी व्यक्त केले.

या अगोदर आमदार पती पत्नीच्या हस्ते हमालवाडा परिसराचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याचा सोहळा पार पडला.त्यानंतर
श्री.व सौ होळकर आणि आमदार सुहास कांदे व अंजुमताई यांच्या हस्ते पुतळा लोकार्पण व शहरातील अहिल्यादेवी चौकात राजमाता
अहिल्यादेवीची राजमुद्रा बसवण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.


. कार्यक्रमास फरहान खान,भाऊसाहेब कातकडे,उपसभापती दीपक मोरे,ज्ञानेश्वर कांदे,धनंजय कांदे,किरण कांदे,उज्वला खाडे,सागर हिरे,सुनील जाधव, रोहिणी मोरे,विद्या जगताप,संगीता बागुल,भारती बागोरे, निशा चव्हाण, नेहा कोळगे, अँड.विद्या कसबे,बापू जाधव, शशी सोनावणे,भावराव बागुल,रमेश काकळीज,आदीसह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.


यावेळी पिवळ्या टोप्या व भंडाऱ्याची उधळण,फटाक्यांची आतशबाजी, यळकोट येळकोट जय मल्हार च्या घोषणा यामुळे संपूर्ण परिसर पिवळाधमक झाला होता.




