राज्यातील ८४ लाख ग्रामीण कुटूंबाच्या शाश्वत विकासासाठी ” उमेद ” चे काम उल्लेखनीय : समाजसेविका अंजुमताई कांदे

गर्जा महाराष्ट्र२४ न्यूज वृत्तसेवा
नांदगाव ता.०६ राज्यातील ८४ लाख ग्रामीण कुटूंबाच्या शाश्वत विकासासाठी ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालय अंतर्गत काम करणाऱ्या उमेद या संस्थेचे कार्य आजपर्यंत संपूर्ण राज्यात जोमाने सुरु आहे,या उमेदच्या कर्मचाऱ्यांची संस्थेची अपेक्षा आहे की,समकक्ष पदावर कायमस्वरूपी नियुक्ती मिळावी,मात्र हा राज्यस्तरीय विषय असल्याने यावर भविष्यात निर्णय होईलच, पण त्यासाठी सरकारलाही थोडा वेळ दिला पाहिजे असे प्रतिपादन समाजसेविका सौ.अंजुमताई कांदे यांनी केले.

. शहरातील गुप्ता लॉन्स मध्ये उमेद कडून तालुकास्तरीय महिला अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर उज्वला खाडे,अश्विनी जाधव,रोहिणी मोरे,सुनीता महाले, भाग्यश्री मोरे,गीता शिंदे,भारती बागोरे,सुर्रय्या मन्सुरी,अश्विनी निकम उषा बागुल, शोभा बिडगर,चैताली मोरे,आदीसह उमेद चे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

सौ. कांदे यांनी सांगितले की, सन २०१२ पासून उमेद ने अगोदर १२ जिल्ह्यात काम सुरु केले होते.तर २०१८ पासून संपूर्ण राज्यात उमेद चे काम सुरु आहे. काम चांगले असल्यानेच पुढे काम करण्याची संधी उमेदला देण्यात आल्याचे सांगून सौ. कांदे म्हणाल्या की,हा विषय आपल्या आमदारांच्या हातात असता तर केव्हाच सोडवून तो (सुहास ) मोकळा झाला असता. पण तरीही सुहास अण्णा मुख्यमंत्री शिंदे साहेबांकडे तुमचा प्रश्न पोहचवतील. तुम्ही निश्चित रहा.असे त्या म्हणाल्या.यावेळी दोन हजार पेक्षा जास्त उमेदच्या महिला अधिकारी, कर्मचारी व सदस्यांनी उपस्थिती लावली होती.

.



