शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी नेहमी कटीबद्ध : आमदर सुहास आण्णा कांदे
नांदगाव मतदार संघातील शिक्षकांच्या स्नेह मेळावा संपन्न

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा
नांदगाव ता.०६. मानव जातीत सर्वात बुद्धिमान,सर्व विषयांची सखोल माहिती अन चातुर्य असलेला व्यक्ती म्हणजे शिक्षक.आणि असे व्यक्तिमत्व असलेल्या घटकांचे मला प्रेम मला मिळाले आहे.हे भविष्यात ही असू दया,तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी कटीबद्ध असेन अशी ग्वाही देतो. असे प्रतिपादन आमदार सुहास कांदे यांनी केले.
.मतदार संघातील सर्व जिल्हा परिषद,खाजगी व इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक,माध्यमिक,कनिष्ठ विद्यालय,महाविद्यालय,खाजगी अनुदानित, आश्रमशाळा शिक्षण क्षेत्रातील अशा सर्व घटकांचा स्नेह मेळावा व प्रीतीभोजन आमदार सुहास कांदे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.
. आमदार सुहास आण्णा कांदे पुढे म्हणाले की,हा मेळावा कुठल्याही राजकीय हेतूने घेतला नाहीये,तुमच्या अडीअडचणी,सुखदुःख, जाणून घ्यावे,समाजातल्या अनेक प्रश्नांची माहिती तुमच्याकडे असते, त्याबद्दल माहिती घ्यावी.किंवा त्यावर साधक बाधक चर्चा या हेतूने हा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तसेच जुनी पेन्शन योजनेबाबत आता काही करता येणार नाही. मात्र ह्या निवडणुकीनंतर मी शब्द देतो की,४०/५० आमदारांचे समर्थन घेऊन हा प्रश्न सभागृहात मांडून तो मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन. असे ही आमदार सुहास आण्णा कांदे यांनी यावेळी सांगितले.
. कुठल्याही शाळेत एखादा हुशार विद्यार्थी परिस्थितीमुळे शिक्षण घेण्यापासून वंचित राहत असेल तर मला कळवा त्याच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च मी करेन.असे ही आमदर श्री.कांदे शेवटी म्हणाले.यावेळी माजी आमदार संजय पवार,समाजसेविका सौ.अंजुमताई कांदे,रमेश पगार,अण्णासाहेब पगार,राजेंद्र पाटील,भाऊसाहेब मवाळ,किरण डोंगरे,डी.एन.डोंगरे,जितेंद्र सोळुंके,यांनी मनोगत व्यक्त केले.

. कार्यक्रमास फरहान खान,किशोर लहाने, सुधीर देशमुख, प्रमोद भाबड, सागर हिरे,सुनील जाधव,प्रकाश शिंदे,उज्वला खाडे, अड विद्या कसबे,रोहिणी मोरे,संगीता बागुल,सुजाता कातकडे,आदीसह शेकडो शिक्षक,शिक्षिका,व शिक्षकेतर कर्मचारी,शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन राजेंद्र देशमुख यांनी केले.



