पुढच्या कारकिर्दीत ऊसतोड कामगारांसाठी कामगार भवन, बांधणार: आमदार सुहास आण्णा कांदे
नांदगाव मतदार संघातील ऊसतोड, मुकादम यांचा स्नेह मेळावा संपन्न

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा
नांदगाव ता.११ साखर कारखान्यासाठी ऊस कामगार टोळी बांधण्यासाठी प्रसंगी मुकादमना प्रसंगी आपल्या बायकोचे दागिने विकावे लागतात.एखादा व्यवहार सुरळीत झाला नाही तर साखर कारखान्याचे पैसे फेडू न शकणाऱ्या मुकादमाला प्रसंगी आत्महत्या करावी लागत असल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. यानंतर कुणावरही मी आत्महत्याची वेळ येऊ देणार नाही.असे प्रतिपादन आमदार सुहास कांदे यांनी केले. नांदगाव मतदार संघातील ऊसतोड मुकादम यांचा स्नेह मेळावा देवाज बंगल्यावर आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

. साखर कारखान्याकडून उचल घेताना मुकादमाला आपली स्थावर मालमत्ता गहाण ठेवावी लागते.मात्र तेच पैसे ऊसतोड मजुरांना मात्र हातावर द्यावे लागतात.म्हणजेच या रकमेची कुठलीही लिखापढी होत नाही. परिणामी काही अप्रामाणिक लोकांमुळे अनेक मुकादमाचे पैसे बुडतात.म्हणून साखर कारखान्याचे पैसे ते भरू शकत नसल्याने अनेकांवर संपत्ती, बायकोचे दागिने विकण्याची वेळ येते.किंबहुना काही मुकादमाना आत्महत्या ही कराव्या लागल्या आहेत.असे सांगून आमदार कांदे पुढे म्हणाले की,लवकरच .अंजुमताई कांदे यांची बँक सुरु होत आहे.त्यातून तुम्हाला पाहिजे तितके कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.
. साखर कारखाने ही तुमच्याशी दुटपी वागतात.उचल घेणाऱ्या मुकादमाना वेगळा भाव तर उचल न घेणाऱ्या मुकादमाना वेगळा भाव देतात.यापुढे एकही मुकादम बांधवावर अन्याय होऊ नये,म्हणून एक सर्वसमावेशक समिती स्थापन करा,त्यात मला सदस्य म्हणून घ्या. तालुक्यात असो वा बाहेर तुमच्यावर कुठे ही अन्याय होऊ दिला जाणार नाही.असे ही आमदार सुहास कांदे म्हणाले.
. आता वेळ निघून गेली आहे.पण मी शब्द देतो की, पुढच्या कारकिर्दीत तुमच्या साठी ऊसतोड कामगार भवन,समिती साठी कार्यालय, ऊसतोड मजुराच्या मुलांसाठी वसतिगृह मंजूर झाले आहे,ते सध्या भाडेत्तवावर सुरु झाले आहे.त्याला स्वतंत्र इमारत,आणि एक मंगल कार्यालय बांधून देईन.यापूर्वी जशी साथ दिली तशी आता ही दया असे आवाहन ही आमदार श्री .कांदे यांनी शेवटी केले.

. यावेळी ज्ञानेश्वर कांदे,किरण कांदे,लभाण बंजारा समाज अध्यक्ष रवींद्र गांगोले, राजेंद्र देशमुख,नींबा मोरे,अनिल सोनावणे, एन.के. राठोड,रावसाहेब शेलार, सुनील जाधव,आबासाहेब भुसारे, प्रमोद भाबड, कांतीलाल चव्हाण,सुनील उगले,दीपक मोरे,भाऊसाहेब चव्हाण,नीलकंठ सानप,उमेश मोरे, रामचंद्र चव्हाण,राजेंद्र तीळवणे,अण्णा मुंडे,आबा नाईक,प्रकाश शिंदे,अप्पा ताडगे,आदीसह मतदार संघातील शेकडो ऊसतोड मुकादम बांधव उपस्थित होते.सूत्रसंचालन अमोल नावंदर यांनी केले.



