कानडे /कानडी जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी विधानसभेत आवाज उठवून न्याय मिळवून देणार : आमदार सुहास आण्णा कांदे

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा
नांदगाव ता.११ अत्यंत कष्टाळू व स्वाभिमानी असलेल्या कानडे /कानडी समाज १९९५ पासून शिवसेनेच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे. तुमच्यामुळे आजपर्यंत शिवसेनेचे तीन आमदार झाले आहेत.अशीच साथ यापुढे ही राहू दया,तुमच्या कानडे /कानडी या जात प्रमाणपत्र बाबत विधानसभेत आवाज उठवून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन असे प्रतिपादन आमदार सुहास कांदे यांनी केले.

नांदगाव मतदार संघातील हिरेनगर येथे आयोजित कानडे /कानडी समाजाच्या मेळाव्यात आमदार श्री कांदे बोलत होते.यावेळी व्यासपीठावर माजी आमदर.संजय पवार,श्रावणगिरी महाराज,राजेंद्र पवार, समाजसेविका सौ.अंजुमताई कांदे,सुजाता कातकडे,विद्या जगताप, रोहिणी मोरे,संगीता बागुल,एकनाथ सदगीर,ऍड.बाळकृष्ण बिन्नर,श्रावण बोगीर,सुनील साळवे,डॉ.अशोक सदगीर,भाऊसाहेब सदगीर,आदी उपस्थित होते.
. या समाजासाठी सुमारे ५० लाख रुपयांचा सभामंडप बांधून दिला आहे.याचे बांधकाम मात्र मंगल कार्यालय पद्धतीने केले आहे.कारण मुख्य व्यवसाय शेती असलेल्या या समाजातील मुलामुलींची लग्ने या ठिकाणी लावता येतील.त्यासाठी लागणारे सर्व साहित्य भांडे,खुर्च्या,टेबल,आदी सर्व आवश्यक साहित्य मी स्वखर्चाने घेऊन देणार आहे.असे ही आमदार सुहास कांदे यांनी यावेळी सांगितले.
मनमाड करंजवन पाणी पुरवठा योजनेच्या जलशुद्धिकरण केंद्रातुन जे पाणी शुद्धीकरण प्रक्रिया झाल्यानंतर वाया जाईल ते पाणी भालूर गटातील शेतीला देता येईल का.? या बाबत विचार सुरु असून,त्याचा ही फायदा या पंचक्रोशीत मोठ्या संख्येने असलेल्या कानडे /कानडी समाज बांधवांच्या शेतीला होईल.असे ही आमदार कांदे शेवटी म्हणाले.
. यावेळी माजी आमदार संजय पवार, राजेंद्र पवार,सौ.अंजुमताई कांदे,साक्षी व्हडगळ,डॉ.अशोक सदगीर,श्रावण बोगीर,श्रावणगिरी महाराज, यांनी मनोगत व्यक्त केले.

. कार्यक्रमास राजेंद्र देशमुख,अंकुश कातकडे,राजू सांगळे,सुकदेव महाराज बिन्नर,नामदेव महाराज बोगीर,शांताराम महाराज सदगीर, उत्तमराव पाटील,हिरामण व्हडगळ,मनोहर बिन्नर,सुदाम बेंडके, भिका बिन्नर,बाजीराव जोरवर,लक्ष्मण भुसणर,साहेबराव सदगीर,विक्रम फोडसे, राजू महाराज,बाळनाथ जोरवर,फकिरा जगताप,कोंडीराम भुसणर,धर्मा भुसणर,शशी सोनावणे,आदीसह कानडे /कानडी समाजाच्या महिला,पुरुष तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन संजय आहेर यांनी केले.



