महाराष्ट्रराजकीय

नांदगांव मतदारसंघातून विद्यमान आमदार सुहास आण्णा कांदे यांना शिवसेनेच्या वतीने पुन्हा संधी.

शिवसेनेची पहिली यादी जाहीर,

.गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा

मुंबई ता.२३ महायुतीमध्ये भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर मंगळवारी रात्री शिवसेनेने ( एकनाथ शिंदे ) यांनी ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुंबई, मराठवाडा, कोकण, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघांचा समावेश आहे. महायुतीमध्ये अजूनही काही जागांवरुन एकमत होत नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मतदासंघ आणि उमेदवार…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून पुन्हा रिंगणात उतरणार आहेत. तर साक्री (अज) विधानसभा मतादरसंघातून श्रीमती मंजुळाताई तुळशीराम गावित,चोपड्यातून चंद्रकांत बळवंत सोनावणे,जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव पाटील,एरंडोलमधून अमोल पाटील,पाचोऱ्यातून किशोर पाटील, मुक्ताईनगरमधून चंद्रकांत निंबा पाटील,बुलढाण्यातून संजय गायकवाड, मेहकरमधून डॉ. संजय रायमुलकर, दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून अभिजीत अडसूळ हे निवडणूक लढतील.

पुढे रामटेक मतदारसंघातून आशिष जैस्वाल, भंडाऱ्यातून नरेंद्र भोंडेकर, दिग्रसमधून संजय राठोड, नांदेड उत्तरमधून बालाजी कल्याणकर, कळमनुरीमधून संतोष बांगर, जालन्यातून अर्जुन पंडितराव खोतकर, सिल्लोडमधून अब्दुल सत्तार, छत्रपती संभाजी नगरमधून प्रदीप जैस्वाल, छत्रपती संभाजी नगर (पश्चिम) मतदारसंघातून संजय शिरसाट, पैठणमधून विलास भूमरे, वैजापूरमधून रमेश बोरनारे, नांदगावमधून सुहास कांदे, मालेगावमधून दादाजी भुसे,ओवळा माजीवडा मतदारसंघातून प्रताप बाबूराव सरनाईक, मागाठाणेमधून प्रकाश सुर्वे,जोगेश्वरी पूर्वमधून मनिषा वायकर, चांदिवली मतदारसंघातून दिलीप लांडे, कुर्ला मतदारसंघातून मंगेश अनंत कुडाळकर, माहीमधून सदा सरवणकर, भायखळ्यातून यामिनी जाधव तर कर्जतमधून महेंद्र थोरवे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.

@@@@@

नांदगांव मध्ये सुहास आण्णा कांदे यांना पुन्हा संधी मिळाल्याने जलोष..

नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास आण्णा कांदे यांना शिवसेनेने पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल मनमाड शिवसेना कार्यालयाला येथे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी शिवसेना,भाजपा,आरपीआय व अंगीकृत संघटना पदाधिकारी उपस्थित होते….

@@@@@@

शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाने माझी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे.पक्षाने जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे,तो मी नक्की सार्थ करून दाखवेन. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये नांदगाव मतदारसंघावरती महायुतीचा भगवा फडकेल.माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवून माझी उमेदवारी जाहीर केल्याबद्दल पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे मनःपूर्वक आभार..!!

सुहास आण्णा कांदे, विद्यमान आमदार महायुती

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.